भोपाळ : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय आखाड्याचा शेवट आज मतप्रक्रियेतून आटोपला.
राज्यात विद्यमान भाजप सरकार विरोधात नाराजी होती तर दुसरीकडे परिवर्तन व्हायला हवे म्हणून काँग्रेसलाही सहानुभूती होती. असे असले तरी कोणतेही सरकार आले, तरी ज्या समस्या आहेत त्या कायम आहे, ही मतदारांची भूमिका ठाम होती.
त्यामुळे मतदारांची नाराजी मामा की कमलनाथ यांच्यापैकी कोणाच्या पथ्यावर पडते, हे आता 3 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
भाजपने लाडली बहना योजनेचा प्रचार करीत महिला मतदारांना आकृष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे यात किती यश मिळते हे लवकरच स्पष्ट होईल. (MP Assembly Election BJP vs congress Result on 3rd December bhopal indore political news)
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी 60 ते 62% पर्यंत मतदान नोंदविल्याचे दिसून आले.
राजधानी भोपाळमध्ये सकाळपासून मतदान केंद्रांवरती मतदार मतदान करण्यासाठी पोहोचले. मतदान केंद्रांवरती विशेषता भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक मतदाराचे मतदान होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसले.
ज्येष्ठ नागरिक व महिलांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी कार्यकर्ते दुचाकी वा चारचाकीतून घेऊन येताना दिसला यांचे मतदान राहिले आहे. अशांना मतदान करण्यासाठी मोबाईल वरून संपर्क साधून आग्रहाने बोलाविले जात होते, हे विशेष..
नाराजी कोणाला भोवनार
भाजपा विषयी असलेल्या नाराजीचा फायदा घेत काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली. त्याचवेळी भाजपने लाडली बहना योजना निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जाहीर करीत महिलांच्या खात्यावर पैसे जमा करणे सुरू केले.
दोन्ही पक्षांविषयी सर्वसामान्य मतदारांमध्ये नाराजी दिसून येते. मतपत्रिकेतून आज मतदार राजा आपली नाराजी कोणावर व्यक्त करतो, हे आता तीन तारखेच्या निकालातूनच स्पष्ट होईल.
या जागांकडे लक्ष्य
बुद्धनीतून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मुरैनातून केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमार, भोपाळ नरेलातून मंत्री विश्वास सारंग, इंदोर एक मधून कैलास विजयवर्गीय, छिंदवाडातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ या जागांवर राज्याचे लक्ष्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.