MP Assembly Election: काँग्रेसच्या यादीत उमेदवार बदलल्याने राडा, खुर्च्यांची तोडफोड

MP Assembly Election
MP Assembly Election
Updated on

MP Assembly Election: काँग्रेसने मध्य प्रदेशातील ८६ उमेदवारांची यादी गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केली.त्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच काँग्रेस अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी असंतोष व्यक्त केला.

कित्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. काँग्रेसने आतापर्यंत २२६ उमेदवारांची नावे घोषित केली आहे या यादीत काँग्रेसने अनुसूचित जमातीचे १८ उमेदवार, अनुसूचित जातीचे १३ आणि दहा महिलांना उमेदवारी दिली आहे. (MP News Update)

काँग्रेसच्या पहिल्या यादीत बहुतेक ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिल्याने असंतोष निर्माण झाला नाही. मात्र दुसरी ८९ जणांची यादी जाहीर झाल्यावर कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला. या यादीत पहिल्या यादीतील तीन उमेदवारांची नावे रद्द करून दुसऱ्याच नेत्याला उमेदवारी दिल्याने हा असंतोष आणखी भडकला.

MP Assembly Election
ISRO Gaganyaan Mission: अंतराळात मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा! इस्रोच्या 'गगनयान मिशन'चे चाचणी उड्डाण यशस्वी

प्रामुख्याने दतिया या मतदारसंघातील उमेदवार बदलल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नरोत्तम मिश्रा आहेत. ते सध्या गृहमंत्री आहेत. त्यांच्या विरोधात पहिल्या यादीत भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले अवधेश नायक यांना उमेदवारी दिली होती. परंतु आज प्रकाशित झालेल्या दुसऱ्या यादीत अवधेश नायक यांची उमेदवारी रद्द करून राजेंद्र भारती यांना उमेदवारी दिली आहे.

राजेंद्र भारती यांनी गेल्या निवडणुकीत मिश्र यांना जोरदार लढत दिली होती. यात केवळ २६०० मतांनी नरोत्तम मिश्रा विजयी झाले होते. त्यामुळे भारती यांनाच पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी झाली. यावरून कमलनाथ व खासदार दिग्विजय सिंग यांच्यातील मतभेद सुद्धा स्पष्ट झाले. दतियामध्ये झालेल्या बदलामुळे अवधेश नायक यांच्या समर्थकांनी दतियाच्या काँग्रेस कार्यालयात धुडगूस घातला.

MP Assembly Election
Winter Session: हिवाळी अधिवेशन अवघ्या 10 दिवसात गुंडाळणार? तात्पुरतं वेळापत्रक जाहीर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.