MP Assembly Election: "इतकी वर्षे सत्तेत राहूनही तुम्ही भाजपचा चेहरा नाही"; शिवराज सिंह यांचं सडेतोड उत्तरं

इतकी वर्षे सत्तेत राहूनही तुम्ही भाजपचा चेहरा नाही; शिवराज सिंह यांचं सडेतोड उत्तरं...
MP Assembly Election
MP Assembly ElectionEsakal
Updated on

MP Assembly Election: मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व  राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका मुलाखतीत विरोधकांवर हल्ला केला. तसेच भाजपचा विजय होणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून नाव दिल्याने त्याच्या माझ्या व्यक्तिमत्त्वावर किंवा कामावर परिणाम होऊ शकत नाही कारण कोणी काय आहे. यापेक्षा तो काम कसे करतो हे महत्वाचे आहे, असे   शिवराज सिंह चौहान म्हणाले.

शिवराज सिंह चौहान यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान राज्यात लागू केलेल्या योजना भाजपला विजय मिळवून देतील असे चौहान यांनी स्पष्ट केले.

भावाला आधार देण्यासाठी बहिणी एकत्र आल्या आहेत. लाडली बहना योजना असो की लाडली लक्ष्मी योजना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के आरक्षण, पोलिसात मुलींची 30 टक्के भरती, किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये थेट भरतीत 35 टक्के आरक्षण असो, आम्ही एक नाही तर अनेक पावले उचलली आहेत. त्यामुळे मातृशक्ती भाजपच्या पाठीशी असल्याचे शिवराज सिंह चौहान म्हणाले.

MP Assembly Election
Assembly Election 2023: छत्तीसगड-मिझोरम विधानसभेसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी रेवडी संस्कृतीच्या विरोधात बोलतात तर याला रेवडी म्हणता येईल का? यावर चौहान म्हणाले, "ही रेवडी संस्कृती नाही. अर्ध्या लोकसंख्येला हा पूर्ण न्याय आहे. महिलांनाही आमच्या जमिनी आणि संसाधनांवर पूर्ण अधिकार आहेत. तरीही आपण आजही पुरुषप्रधान समाज आहोत हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून, आम्ही ठरवले की आम्ही महीलांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्ण सहकार्य करु. "

"मी 2017 मध्ये माझ्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोषण पातळी चांगली झाली. ही रेवडी नाही. जेव्हा कुटुंबातील आई, बहीण किंवा मुलीकडे पैसा जातो तेव्हा ती त्याचा चांगला वापर होतो. ती आधी मुलांवर आणि नंतर कुटुंबाच्या गरजांवर खर्च करते. म्हणून, आईला पैसे द्या. प्रशासकीय यंत्रणेपेक्षा ती त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करेल", असे चौहान यांनी स्पष्ट केले.

भाजप जिंकल्यास मुख्यमंत्री होण्यावर शिवराज सिंह चौहान म्हणाले, "मला याची काळजी नाही. वैभवशाली, सशक्त आणि समृद्ध भारताची निर्मिती हे राजकारणातील माझे ध्येय आहे. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी भाजपचा कार्यकर्ता आहे. कोण कोणते काम आणि कुठे करणार हे मिशन ठरवेल." (Madhya Pradesh Assembly Election)

इतकी वर्षे सत्तेत राहूनही तुम्ही भाजपचा चेहरा नाही, याचे वाईट वाटले नाही का? असा प्रश्न देखील चौहान यांना विचारण्यात आला. माझे नाव शिवराज सिंह चौहान आहे. या छोट्या गोष्टी माझ्या व्यक्तिमत्वावर किंवा कामावर कधीही परिणाम करू शकत नाहीत. तुम्ही काय आहात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही कसे काम करता हे महत्त्वाचे आहे, असे चौहन म्हणाले.  

MP Assembly Election
Eknath Shinde : लोकांच्या समस्या जाणून घेत CM शिंदेंनी दऱ्यातील हळदीच्या शेतात केलं दोन तास काम!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.