MP Assembly Election: मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी पाच वाजता थंडावल्या. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये राज्यभरातील आढावा घेण्याला सुरुवात झाली.
प्रामुख्याने काँग्रेसला महाकौशल्य आणि नेमाड या प्रांतावर आपली भिस्त राखावी लागणार आहे. तर भाजपचा गड असलेल्या प्रांत कायम राखण्याचे आव्हान असणार आहे. विशेषतः तोमर व्हिडिओ प्रकरणावरून विंध्य प्रांत निसटण्याची शक्यता न करता येत नाही. (MP Assembly Election state wide review has begun between Congress and BJP leaders and workers news
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारी मतदान होत आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी पाच वाजता राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. काँग्रेसतर्फे या निवडणुकीत बेरोजगारी भ्रष्टाचार या मुद्द्यांना धरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला तर भाजपने काँग्रेसच्या कार्यकाळातील मागासलेले राज्याला गेल्या 18 वर्षात विकासाच्या मार्गावर आणल्याचा दावा केला.
मध्यप्रदेश मध्ये 230 विधानसभा असून प्रामुख्याने ग्वाल्हेर-चंबळ, विंध्य, महा कौशल्य, मध्य भारत, आणि नेवाड या पाच प्रांतांमध्ये राज्य विभागले जाते. या पाचही प्रांतांची सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती भिन्न भिन्न आहे. त्यामुळे येथील समीकरणावर दोन्ही पक्ष आपसात लढत आहेत.
ग्वाल्हेर-चंबळ
2018 च्या निवडणुकीत या प्रांतातून 34 पैकी 27 जागा काँग्रेसने पटकावल्या होत्या. मात्र अवघ्या पंधरा महिन्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही आमदारांसह काँग्रेस मधून बाहेर पडले. त्यामुळे कमलनाथ सरकार गडगडले होते. यावेळी या प्रांतात नाराजीची लाट असली तरी सिंधिया प्रांतात तळ ठोकून आहेत.
विंध्य
विंध हा मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल प्रांत आहे. हा प्रांत कधीकाळी काँग्रेसचा अभेद्य गड होता. मात्र आता तो भाजपचा गड झाला आहे. येथील 30 जागांपैकी गेल्यावेळी 24 जागा भाजपच्या होत्या. यावेळी या घटनेची शक्यता आहे.
याच मतदारसंघातून केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर खासदार आहेत. मात्र तोमर व्हिडिओ प्रकरणावरून या ठिकाणी काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. परिणामी त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाकौशल्य
नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती असलेल्या महाकोशल प्रांतात जबलपूर, कटनी, डिंडोरी, मंडला, नरसिंह पूर, बालाघाट, सीवणी, छिंदवाडा, पांढुरणा या जिल्ह्यांमध्ये 38 विधानसभा असून या ठिकाणी भाजपला अवघ्या 13 जागा मिळाल्या होत्या. आदिवासी बहुल प्रदेश असल्याने येथील समस्या सोडविण्यात भाजपला नेहमीच अपयश आलेले आहे. तरीही यावेळी भाजपने पूर्ण ताकदीनिशी या प्रांतात प्रचार सभा घेतल्या.
मध्य भारत
राज्याची राजधानी भोपाळ यासह सिहोर, रायसेन, राजगड, विदिशा, नर्मदापुरम, बैतूल आणि हरदा या जिल्ह्यांचा मध्य भारत प्रांत म्हणून ओळखला जातो. भाजपच्या या गडामध्ये काँग्रेस कडून जोरदार प्रचार सभा घेण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांच्या भोपाळ मधील रोड शोला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे पाहून काँग्रेस या प्रांतात मुसंडी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला या प्रांतातून 36 पैकी अवघ्या बारा जागा जिंकता आल्या होत्या
नेमाड
नर्मदा घाटीच्या क्षेत्रात वसलेल्या प्रांताला निवड म्हटले जाते. विस्तार आणि मोठा असलेल्या या प्रदेशात विधानसभेच्या 66 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत या प्रांतातून काँग्रेसने 40 जागा जिंकत राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे या प्रांतातील जागा जिंकण्यासाठी भाजपने कसोशीने प्रयत्न केले आहेत. या प्रांतात जो पक्ष वर्चस्व राहतो त्याची सत्ता राज्यात येते असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.