नवी दिल्ली - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली रणनीती बदलली असून अनेक केंद्र सरकारमधील दिग्गजांना मैदानात उतरवले आहे. यापैकी एक नाव म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय.
भाजपने त्यांना मध्य प्रदेशच्या इंदूर-1 विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी मंगळवारी संध्याकाळी या विधानसभेत भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना निवडणूक लढवण्याची माझी एक टक्काही इच्छा नसल्याचं म्हटलं.