इंदौर : मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराज चौहान हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरे करीत असताना मतदारांमध्ये रेवड्या वाटत असल्याची इंदोरमधील मतदारांनी मात्र खिल्ली निवडवली आहे.
काँग्रेसच्या घोषणा पत्रातील सामाजिक मुद्दे या मतदारांना भावताना दिसत आहे. (MP Assembly Elections Social issues of Congress appeal to voters indore bjp congress political)
भाजपाने लोटस ऑपरेशन राबवून कमलनाथ सरकार उलथून लावले. आणि शिवराज चौहान यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार आणले 230 विधानसभा जागांसाठी मध्य प्रदेश मध्ये विधानसभा निवडणूक रंगात आलेली आहे.
मुख्यमंत्री राज्यभर दौरे करीत असताना मतदारांना भावनिक साथ घालतात तसेच अरे एवढ्या वाटतात याचा इंदौरकर मतदारांनी मात्र खिल्ली उडवली आहे.
लाडली बेटीचा उदो उदो करणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्यात तिचा नामूल्य काही नाही ही बाब मतदारांना खटकल्याचे दिसते, तर दुसरीकडे पाचशे रुपयात गॅस सिलेंडर देतानाचे आश्वासन असले तरी त्यामागे असलेल्या अटी शर्ती सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या नाहीत.
याउलट काँग्रेसने राजस्थान छत्तीसगड याप्रमाणेच मध्य प्रदेशातही पाचशे रुपयात गॅस सिलेंडर, मुलींसाठी विशेष योजना, महिलांसाठी योजना, कामगारांच्या योजना आणि पेन्शन योजना या मतदारांना धावत असल्याने रेवड्यांना कोण विचारतो असा सवालही मतदार करताना दिसले.
"आत्तापर्यंत आम्ही कट्टर भाजपा समर्थक होतो पण आत्ता नाही रेवड्या देऊन देऊन मुख्यमंत्र्यांनी काय केले ते आम्हालाच माहिती मला आता बदल हवाय. हवा बदल रही है..."
- समीर तिवारी, मतदार, इंदौर
"शिक्षण घेऊन रोजगार नाही आम्ही देशाचे भविष्य कसं काय असू शकू देशाचे भविष्य होण्यासाठी हाताला काम असणे गरजेचे आहे."- बाबूभाई, तरुण मतदार, इंदौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.