New Parliament: नव्या संसद भवनात रामाच्या पादुका स्थापित करा; भाजप आमदाराची मोदींकडं मागणी

भाजप आमदार नारायण त्रिपाठी हे अजब मागण्यांमुळं कायम चर्चेत राहिले आहेत.
New Parliament Building
New Parliament Buildingsakal
Updated on

नवी दिल्ली : नवं संसद भवन सध्या देशात सर्वत्र चर्चेत आहे. विरोधकांनी या भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार घातला आहे. पण आता आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे मध्य प्रदेशचे आमदार नारायण त्रिपाठी यांनी नव्या संसद भवनाच्या परिसरात श्रीरामाच्या पादुका स्थापित कराव्यात अशी मागणी करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. (MP BJP MLA Writes to PM Modi suggest Lord Shriram Paduka to Keep In New Parliament)

New Parliament Building
Loudspeakers on Mosques: मशिदींवरील भोंग्यांवरुन हायकोर्टानं मुंबई पोलिसांना झापलं! दिले 'हे' आदेश

भाजप आमदार नारायण त्रिपाठी हे अजब मागण्यांमुळं कायम चर्चेत राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशात अर्जुन सिंह यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली होती. तर एकदा मध्य प्रदेशचं विभाजन करुन विंध्य प्रदेश हा वेगळा प्रांत निर्माण करण्याची मागणी केली होती. आता त्यांनी चर्चेत राहण्यासाठी श्रीरामाची मदत केली आहे. (Latest Marathi News)

New Parliament Building
Yasin Malik: फुटिरतावादी यासिन मलिकच्या फाशीची मागणी; NIAची दिल्ली हायकोर्टात धाव

त्रिपाठी यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं यामध्ये त्यांनी म्हटलं की, ही अत्यंत आनंदाची बाब आहे की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या नव्या संसद भवनाचं २८ मे २०२३ रोजी उद्घाटन होत आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि नव्या भारत सरकारमध्ये सत्ता हस्तांतरणाचं प्रतिक असलेल्या २६०० वर्षांपूर्वीच्या चोल राजवंशाचा राजदंड 'सेंगोल' स्थापित होणार हे स्वागतार्ह आहे. (Latest Marathi News)

New Parliament Building
Samruddhi Expressway: इंटिलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे रोखणार 'समृद्धी'वरील अपघात; फडणवीसांनी सांगितली सिस्टिम

आता रामराज्याची स्थापना करा

पत्रात त्रिपाठी यांनी पुढे लिहिलं की, "भारतीय सनातन धर्म आणि संस्कृतीपासून भारतीय संविधानापर्यंत संपूर्ण भारत कायम ७५०० वर्षांपूर्वी रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रतिबद्ध आहे. प्रभू श्रीरामानं गुरुजनांच्या सहमतीनं स्वतः आपल्या चरण पादुका (खडाऊ) प्रतिकाच्या स्वरुपात भारताला अर्पण केली होती. त्यामुळं याची स्थापना संसद भवन परिसरात करण्यात यावी"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.