MP Bungalow Vacate Process: पराभूत झालेल्या माजी खासदारांना किती दिवसात सोडावे लागते सरकारी निवासस्थान!

एखाद्या खासदारांनी बंगला सोडला नाही तर किती दंड किंवा शिक्षा दिली जाते?
MP Bungalow Vacate Process
MP Bungalow Vacate Processesakal
Updated on

MP Bungalow Vacate Process:

देशात लोकसभेची निवडणूक एनडीएने जिकली आणि नुकतेच पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. नव्या सरकारमध्ये अनेक खासदार असे आहेत जे दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा सभागृहात प्रवेश करणार आहेत.

काहीजण पहिल्यांदाच खासदार झालेले आहेत. जे आधीच खासदार आहेत त्यांची निवासस्थाने कायम राहतील. मात्र नवनिर्वाचित खासदारांना सरकारी बंगले दिले जातील. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या खासदारांना त्यांचे निवासस्थान सोडावे लागणार आहे. ते किती दिवसात सोडावे लागते, त्यासाठी काय नियम आहेत, याबद्दल माहिती घेऊयात.

MP Bungalow Vacate Process
MP Salary: खासदारांना किती पगार मिळतो? कोणत्या सुविधा मिळतात? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

लोकसभेचे सदस्यत्व संपल्यानंतर निवासस्थान सोडण्याचाही नियम आहे. खासदार आणि मंत्र्यांना त्यांच्या ज्येष्ठतेच्या आधारे सरकारी बंगले दिले जातात. केंद्रीय मंत्री आणि खासदारांना दिल्लीत बंगले देण्यात आले आहेत. खासदार आणि मंत्र्यांना त्यांच्या सभागृहाच्या सदस्यत्वाच्या आधारे निवासस्थान मिळते.

पराभव झालेल्या खासदारांचे सदस्यत्व संपल्यानंतर त्यांना महिनाभरात सरकारी बंगला रिकामा करावा लागतो. त्यासाठी नियमित नोटीस बजावली जाते. नोटीस मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत घर रिकामे करावे लागेल. पब्लिक प्रिमायसेस इव्हिकशन ऑफ अनऑथोराइज्ड ऑक्युपंट्स ॲक्ट अंतर्गत सरकारी बंगले रिकामे केले जातात.

MP Bungalow Vacate Process
AAP MP Sanjay Singh : हे असं कसं झालं? तिहार जेलमध्ये ६ किलो वाढलं आप खासदाराचं वजन; रिपोर्टमध्ये समोर आली माहिती

कोणताही वाद झाल्यास कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. विशेष परिस्थितीत बंगला रिकामा करण्यासाठी बळाचा वापर केला जाऊ शकतो.

…तर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल

 2019 मध्ये नेत्यांनी निवासस्थान सोडावे यासाठी कायदा बनवण्यात आला आहे. या, कायद्यानुसार जर कोणी निर्धारित वेळेत बंगला रिकामा केला नाही तर त्याच्याकडून 10 लाख रुपये दंड आकारला जाऊ शकतो. नोटीस दिल्यानंतर सरकार बंगला रिकामा करण्याची प्रक्रिया सुरू करू शकते.

ल्युटियन झोनमध्ये दिलेले सरकारी बंगले राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, खासदार आणि ब्यूरोक्रेट्स यांना दिले जातात. या निवासस्थानांच्या देखभालीचे काम डायरेक्टोरेट ऑफ एस्टेट यांच्यामार्फत केले जाते.

MP Bungalow Vacate Process
BJP MP News: भाजपचे खासदार फुटणार?, सदस्यसंख्या होणार २३७, 'या' राज्यात खेला होबे

दिल्लीतील ही निवासस्थाने 1922 मध्ये तयार केली गेली आगेत. जे शहरी गृहनिर्माण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

कोणाला कोणते घर हे कसं ठरवलं जातं?

पगार आणि सेवाज्येष्ठतेच्या आधारावर या बंगल्यांचे वाटप केले जाते. लोकसभा असो वा राज्यसभा खासदार, त्यांना घरे देण्याचे काम दोन्ही सभागृहांच्या गृहनिर्माण समितीकडून केले जाते. वाटप केलेल्या घरांमध्ये वेगवेगळ्या श्रेणी देखील आहेत.

हे प्रकार IV ते प्रकार VIII पर्यंत आहेत, जे खासदार, केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना दिले जातात. पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदाराला टाइप IV VIII बंगला मिळतो. एकापेक्षा जास्त वेळा निवडून आलेल्या खासदारांना टाइप बंगला दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.