Chandrashekhar Azad: "जे संविधानविरोधी काम करतील त्यांना..."; पहिल्यांदाच खासदार म्हणून काम करणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांनी स्पष्ट केली स्ट्रॅटेजी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी नवनिर्वाचित सर्व खासदारांचा सदस्यपदाचा शपथविधी पार पडला.
Chandrashekhar Azad
Chandrashekhar AzadSakal

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी नवनिर्वाचित सर्व खासदारांचा सदस्यपदाचा शपथविधी पार पडला. यावेळी आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) प्रमुख चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे पहिल्यांदाच खासदार म्हणून संसदेत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी आपण पुढील पाच वर्षे संसदेत कशा पद्धतीनं काम करणार यामागे आपली काय स्ट्रॅटेजी असेल हे सांगितलं. तसंच जे संविधानविरोधी काम करतील त्यांच्याबाबतही कसं काम करु हे सांगितलं. (MP Chandrashekhar Azad explained strategy about those who will do unconstitutional work)

पहिल्यांदाच संसदेत काम करायची संधी मिळाली आहे तर कसं काम करणार? या प्रश्नावर आझाद म्हणाले, अद्याप संधी मिळालेली नाही. आता तर मी आलो आहे, पण जेव्हा हा आवाज तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला तो आवडेल. कारण हा आवाज कायम निष्पक्ष आणि कमजोर लोकांसाठी असेल. मी त्यांचा आवाज आहे ज्यांना माणूसही मानलं गेलेलं नाही. मी त्यांचा आवाज आहे ज्यांना जनावर समजून आर्थिक आणि सामाजिक आधारावर चिरडलं गेलं त्यांचा मी आवाज आहे.

Chandrashekhar Azad
Amol Mitkari: "चंद्रकातदादा पालकमंत्री असताना ड्रग्जच्या घटना व्यवस्थित सुरु होत्या"; मिटकरींचा खळबळजनक आरोप

खासगी विधेयकं आणू

इथं जे काही कायदे तयार होतील त्यात जर काही तृटी असतील तर त्यात सुधारणा होण्यासाठी त्याला विरोध करुन त्यात सुधारणा करु. यासाठी सरकारचं लक्ष वेधून घेऊ. खासगी विधेयकं आणून चर्चा घडवून आणू. लोकसभेचा कार्यकाळ वाढवला जावा जेणे करुन खूप मुद्द्यांवर सविस्तरपणे चर्चा व्हावी, अशी मागणी मी करणार आहे, असंही आझाद यांनी म्हटलं आहे.

Chandrashekhar Azad
Pune Mall Drugs Case: पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन! नवा व्हिडिओ व्हायरल; एफसी रोडच्या घटनेनंतर पुन्हा खळबळ

संविधान मानणारा व्यक्ती...

तसंच लोक म्हणत होते की चंद्रशेखर आझाद यांचं राजकारण हे जातीय राजकारण आहे. पण लोकसभेला त्यांना सर्व जातीच्या आणि वर्गाच्या लोकांनी निवडून दिलं. त्यामुळं हे आता सिद्ध झालं आहे की, मी कुठलं राजकारण करतो, असंही चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे. मी संविधान मानणारा व्यक्ती असून जातीच्या चौकटीत अडकणारा व्यक्ती नाही. मी जातविरहित समाज निर्माण करणे हे माझं लक्ष्य आहे यातूनच देश घडणार आहे, असंही आझाद यांनी म्हटलं आहे.

Chandrashekhar Azad
Wheat Flour: गहू अन् पीठाच्या किंमती वाढल्या! सरकारनं घेतला मोठा निर्णय

जोपर्यंत संसेद तोपर्यंत...

मी विश्वास देतो की जोपर्यंत चंद्रशेखर आझाद संसदेत आहे तोपर्यंत प्रत्येक अन्यायाविरोधात आवाज उठवला जाईल. तसंच राज्याच्या किंवा केंद्राच्या सरकारांकडं उत्तर मागितली जातील. जे पण सरकार संविधानाच्या विरोधात जाऊन, सामान्य जनतेच्याविरोधात जाऊन काम करेल त्यांच्याकडून उत्तर मागितलं जाईल.

तसेच मी स्पष्ट करु इच्छितो की, मला ज्या लोकांनी प्रतिनिधी बनवून पाठवलं आहे त्यांच्यासाठी आवाज उठवणं ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी मी पूर्णपणे निभावेन. यामध्ये युवक, शेतकरी, महिला किंवा वंचित वर्गातील कोणीही असो किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जो हटवण्यात आला आहे त्याबाबत मी लोकसभा अध्यक्षांना दखल घेण्यास सांगणार असून हे ठीक नाही, असंही चंद्रशेखर आझाद यांनी स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com