Aukaat Remark : ट्रक ड्रायव्हरला 'औकात' विचारणाऱ्या कलेक्टरवर मुख्यमंत्र्यांची कारवाई; म्हणाले, मी स्वतः कामगाराचा मुलगा...

सोमवारी शाजापूरच्या जिल्हाधीकाऱ्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर मध्यप्रदेश मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.
MP cm mohan yadav on shajapur collector kishore kanyal over aukat remark viral video
MP cm mohan yadav on shajapur collector kishore kanyal over aukat remark viral video
Updated on

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी साजापूर कलेक्टर किशोर कन्याल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यादव यांनी हे सरकार गरिबांचे सरकार आहे, सर्वांच्या कामाचा आणि भावनांचा सन्मान झाला पाहिजे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात गरीबांच्या कल्याणासाठी आपण काम करत आहेत. माणूस म्हणून अशी भाषा आपल्या सरकारमध्ये खपवून घेतली जाणार नाही, मी स्वतः एका कामगाराचा मुलगा आहे. अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही, अधिकाऱ्यांनी भाषा आणि वर्तुवणूकीबद्दल काळजी घ्यावी, असे म्हटले आहे.

कलेक्टरांना हटवण्याचं कारण काय?

तर सोमवारी शाजापूरच्या जिल्हाधीकाऱ्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये ते एका बैठकीदरम्यान ट्रक ड्रायव्हरला तुझी औकात काय आहे असं म्हणाले होते. यानंतर त्यांनी स्वतःची चूक मान्य करत दिलगीरी देखील व्यक्त केली. साजापूर कलेक्टर किशेर कन्याल यांनी ड्रायव्हर्स असोसिएशनची बैठक बोलवली होती, यादरम्यान हा प्रकार घडला होता.

MP cm mohan yadav on shajapur collector kishore kanyal over aukat remark viral video
Lok Sabha Election : काँग्रेसची 290 जागांची तयारी; लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्यात किती जागा लढवणार? 'असा' आहे प्लॅन

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, मी स्पष्टपणे सांगतो की कोणीही कायदा हातात घेणार नाही. यावर एका चालकाने जिल्हाधिकाऱ्यांना व्यवस्थित बोला असं सांगितले. दरम्यान, यावर जिल्हाधिकारी संतापले आणि, यात काय चूक आहे? तु स्वतःला काय समजतोस, काय करशील? तुझी औकात काय आहे? म्हणाले. याला उत्तर देताना ड्रायव्हर म्हणाला की, आमचा लढाच हा आहे की, आमची काही औकात नाही. यावर कलेक्टर म्हणाले की, मारामारी असचं होत नाही, कृपया कोणताही कायदा हातात घेऊ नका, तुमचे सर्व म्हणणे ऐकण्यासाठी मी तुम्हाला येथे बोलावले आहे.

MP cm mohan yadav on shajapur collector kishore kanyal over aukat remark viral video
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू होणार CAA? अधिकाऱ्याने दिली महत्वाची माहिती
MP cm mohan yadav on shajapur collector kishore kanyal over aukat remark viral video
Lok Sabha Election : काँग्रेसची 290 जागांची तयारी; लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्यात किती जागा लढवणार? 'असा' आहे प्लॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.