मुलगा असूनही मुलींच्या स्टाईलमध्ये बनवायचा रील्स; दोन दिवसांपूर्वी संपवलं जीवन, सत्य आलं समोर

crime news
crime news
Updated on

मध्य प्रदेशात उज्जैनमधील नागझरी पोलीस स्टेशन परिसरात दोन दिवसांपूर्वी दहावीच्या विद्यार्थ्याने घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थ्याची आई घरी परतली तेव्हा तीला मुलगा लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यामुळे तिने ओरडा केला. यानंतर लोकांच्या मदतीने त्याला खाली उतरवले. त्याला रुग्णालयात नेले आणि पोलिसांना माहिती दिली.

प्रियांशू राजेंद्र यादव असे विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने बुधवारी सायंकाळी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेच्या वेळी घरात कोणीही नव्हते. त्यामुळेच प्रियांशूला कोणत्या समस्येमुळे एवढे मोठे पाऊल उचलावे लागले हे सांगणे कठीण आहे. (Latest Crime News)

पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला. विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याचा तपास करताना पोलिसांना निदर्शानस आलं की सदर विद्यार्थी मुलींच्या स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर रील्स बनवत असे. त्याचे हजारो फॉलोअर्स होते. मुलींसारखे व्हिडीओ बनवल्यामुळे अनेक दिवसांपासून त्याला ट्रोल केले जात होते. लोक त्याला अश्लील मेसेजही पाठवत होते.

crime news
Ind vs Pak : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा रंगणार क्रिकेटचा सामना! BCCI ने केली टीम इंडियाच्या शेड्यूलची घोषणा

नागझरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार के.एस. गेहलोत यांनी आतापर्यंत केलेल्या तपासात हे निश्चितपणे समोर आले आहे की, प्रियांशूने इन्स्टाग्रामवर रील्स तयार केले होते. मुलगा असूनही तो मुलीसारखा पेहराव करून रील बनवल्याने त्याला ट्रोल केले जात होते.

मेक-अप, नेलपॉलिश, ज्वेलरी आणि कपडे घालण्यासोबतच तो वेगवेगळ्या कपड्यांमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर टाकत होता. पोलिस ट्रोल करणाऱ्या लोकांचे मोबाईल चेक करत आहेत. तसेच कमेंट्सच्या दबावाखाली प्रियांशूने हे मोठे पाऊल उचलले नाही ना?, याचा तपास करत आहेत. (Latest Marathi News)

प्रियांशु आई सोबत राहत होता -

प्रियांशू त्याची आई प्रीती यादव यांच्यासोबत राहत असल्याचे सांगितले जाते. प्रियांशूची आई प्रीती यादव आणि वडील राजेंद्र यांचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. तेव्हापासून प्रियांशु हा उज्जैन पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता 10वीत शिकत होता.मृत प्रियांशूची आई एका फार्मा कंपनीत एमआर म्हणून काम करते. आई सांगते की प्रियांशूचा त्याच्या मित्रांशी किंवा परिसरातील कोणाशीही वाद नव्हता.

crime news
D.Y. Chandrachud: "सरकारने लोकांना..."; डिजिटल युग अन् आव्हानांबद्दल DY चंद्रचूड यांचे महत्वाचे विधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.