MP Election: काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करू नये; केंद्रीय मंत्र्याची टीका !

MP Election: काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करू नये; केंद्रीय मंत्र्याची टीका !
Updated on

MP Election: काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपच्या विरोधात जनमत करण्याचे काम केले जात आहे. ही बाब कर्नाटकच्या निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आली. आता तेच काम मध्यप्रदेशातही केले जात आहे.

परंतु मुळात काँग्रेसला भ्रष्टाचाराचा वारसा असून काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करू नये, असा टोला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. राजीव चंद्रशेखर यांनी हाणला.

ते म्हणाले, ‘‘ कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने बोम्मई सरकार ४० टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप केला होता. यावरून काही भ्रष्ट कंत्राटदारांना हाताशी धरून तसे जनमत तयार करण्यात यशस्वी झाले होते. हाच प्रकार आता मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सरकारच्या विरोधात काँग्रेस करत आहे.

MP Election: काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करू नये; केंद्रीय मंत्र्याची टीका !
Maha Jyoti Ph D Subsidy : महाज्योती संस्थेतर्फे 1884 पीएच. डी. करणाऱ्यांना 24 कोटी; या संकेतस्थळावर करा अर्ज

काँग्रेसने दिलेली कोणतिही आश्वासने पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कर्नाटकमध्ये लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. परंतु निवडणुकीपूर्वी केवळ लोकांच्या मतांवर डोळा ठेऊन काँग्रेसने जनतेला गॅरंटी देण्याचा सपाटा लावला आहे’’.

काँग्रेसला मुळात भ्रष्टाचाराचा वारसा आहे. काँग्रेसच्या काळात झालेली अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजली आहे. काँग्रेसने खोटे बोलून सत्तेवर येण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या भविष्याच्या बाबत काँग्रेसला दृष्टी नाही, असा आरोप चंद्रशेखर यांनी व्यक्त केला.

MP Election: काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करू नये; केंद्रीय मंत्र्याची टीका !
Mahrashtra Political Crisis: सत्तासंघर्षाचा उद्या फैसला; झिरवाळ म्हणतात, सरकार स्थिर व्हायला पाहिजे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.