Bharat Mata ki jai: पाकिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपीला ज्या अटींवर जामीन दिला त्याची सध्या चर्चा सुरु आहे. खटला सुरु आहे तोपर्यंत आरोपीला प्रत्येक महिन्यात दोनवेळा भोपाळ पोलिस ठाण्यात जाऊन राष्ट्रीय ध्वजाला सलामी द्यावी लागेल आणि भारत माता की जय.. अशी घोषणा द्यावी लागेल. असं २१ वेळा करावं लागणार आहे.