MP : ग्वाल्हेरमध्ये भाजपला धक्का; ५७ वर्षांनंतर काँग्रेसच्या विजयाच्या जवळ

Jyotiraditya scindia Madhya Pradesh Election News
Jyotiraditya scindia Madhya Pradesh Election NewsJyotiraditya scindia Madhya Pradesh Election News
Updated on

ग्वाल्हेर : मध्य प्रदेश शहरी संस्थांच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. राजधानी भोपाळ, उज्जैन, इंदूरसह ७ महापालिकांमध्ये भाजपने महापौरपदावर कब्जा केला आहे. परंतु, पक्षाला सर्वांत मोठा घाव ग्वाल्हेरमध्ये (Gwalior) बसला आहे. जिथे ५७ वर्षांनंतर काँग्रेसने विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या उमेदवार शोभा सिकरवार भाजपच्या सुमन शर्मा यांच्यावर विजय मिळवताना दिसत आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी येथे प्रचार केला होता. परंतु, पक्षाला विजय मिळवून देण्यात यश आले नाही.

ग्वाल्हेरमध्ये भाजपचा (BJP) पराभव आणि काँग्रेसच्या (Congress) विजयामागे सतीश सिकरवार यांची सर्वाधिक चर्चा आहे. कारण, त्यांच्या पत्नी शोभा सिकरवार विजयी झाल्या आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर भगवा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सीकरवार यांना यापूर्वी विधानसभा पोटनिवडणुकीतही ताकद लक्षात आली होती. त्यानंतर त्यांनी सिंधिया यांच्या जवळच्या मित्राचा पराभव केला. सतीश सिकरवार हे ग्वाल्हेर पूर्व येथून आमदार आहे. ही जिल्ह्यातील सर्वांत मोठी आणि लोकप्रिय जागा आहे.

Jyotiraditya scindia Madhya Pradesh Election News
PM मोदी आणि CM योगी यांचे फोटो फेकले कचऱ्यात; सफाई कामगार निलंबित

काँग्रेससोबत बंड करून ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) भाजपमध्ये आले तेव्हा काँग्रेसचे आमदार मुन्ना लाल गोयल यांनीही त्यांची बाजू बदलली. पोटनिवडणुकीत भाजपने मुन्ना या सिंधियाचा जवळचा सहकारी उमेदवार उभा केला. त्यामुळे नाराज झालेले भाजपचे जुने नेते सतीश सिकरवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पोटनिवडणुकीत सिकरवार यांनी मुन्ना यांचा ८,५५५ मतांनी पराभव केला. मात्र, याआधी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत मुन्ना हे सतीश सिकरवार यांच्यावर भारी पडले होते. सतीश सिकरवार हे भाजपचे नगरसेवक राहिले असून, तळागाळातील नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांवर त्यांची मजबूत पकड होती.

Jyotiraditya scindia Madhya Pradesh Election News
MP : पराभव झाल्याचे कळताच काँग्रेस उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू

सतीश सिकरवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत गेले. सतीश सिकरवार यांच्या चांगल्या प्रतिमेचा त्यांना खूप फायदा झाला आहे. त्याचबरोबर भाजपचे जुने नेते व कार्यकर्त्यांना त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट न देऊन अन्याय केल्याचे अनेक भाजप समर्थकांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.