Video: दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न; रस्त्याला विरोध केल्याने मुरुमाचा कंटेनर अंगावर केला खाली

एका खासगी जमिनीवर रस्ता बनवण्याचा प्रयत्न सुरु होता. याच गोष्टीचा विरोध आशा पांडेय आणि ममता पांडेय यांनी केला होता. रस्त्यावर मुरुम टाकण्यासाठी डंपर आला तेव्हा या महिला डंपरच्या मागे उभ्या राहिल्या. त्याचवेळी डम्पर चालकाने मुरुमाने भरलेली ट्रॉली या महिलांच्या अंगावर खाली केली. त्यामुळे दोन्ही महिला मुरुमाखाली गाडल्या गेल्या.
Video: दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न; रस्त्याला विरोध केल्याने मुरुमाचा कंटेनर अंगावर केला खाली
Updated on

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातल्या रीवा जिल्ह्यामध्ये गुंडांनी दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला आहे. खासगी जमिनीवर जबरदस्तीने रस्ता बनवण्याच्या कामाला महिलांनी विरोध केला होता. वेळीच या महिलांना त्यांच्या घरच्यांनी बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रीवा जिल्ह्यातल्या मनगवा चौकीअंतर्गत असलेल्या हिनौता जोरौट गावातली आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. काँग्रेसच्या नेत्यांनी घटनेचे व्हिडीओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

Video: दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न; रस्त्याला विरोध केल्याने मुरुमाचा कंटेनर अंगावर केला खाली
Kokan Railway: एका मिनिटांत गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल, गैरप्रकाराचा संशय!

एका खासगी जमिनीवर रस्ता बनवण्याचा प्रयत्न सुरु होता. याच गोष्टीचा विरोध आशा पांडेय आणि ममता पांडेय यांनी केला होता. रस्त्यावर मुरुम टाकण्यासाठी डंपर आला तेव्हा या महिला डंपरच्या मागे उभ्या राहिल्या. त्याचवेळी डम्पर चालकाने मुरुमाने भरलेली ट्रॉली या महिलांच्या अंगावर खाली केली. त्यामुळे दोन्ही महिला मुरुमाखाली गाडल्या गेल्या.

महिलांचे काही नातेवाईक आणि गावकरी तेथे हजर होते. त्यामुळे त्यांनी तातडीने खोऱ्याच्या मदतीने मुरुम बाजूला करुन महिलांना बाहेर काढलं. मुरुम बाजूला करण्यास जराही वेळ लागला असता तर त्या महिलांचा मृत्यू होऊ शकला असता.

Video: दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न; रस्त्याला विरोध केल्याने मुरुमाचा कंटेनर अंगावर केला खाली
Vishalgad Violence: विशाळगडावर 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? काय तथ्य अन् काय मिथ्य? संभाजीराजे छत्रपतींचा लेख

याप्रकरणी एएसपी विवेक लाल यांनी सांगितलं की, रस्त्याच्या कामाला महिलांनी विरोध केला होता. त्याचवेळी त्यांच्या अंगावर मुरुम टाकण्यात आला. या प्रकरणाचा पोलिस तपास करत असून घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com