MP Politics: कमलनाथ यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव; मध्य प्रदेशात पक्षातील एकाधिकारशाही व पक्षश्रेष्ठींची नाराजी भोवली?

मध्य प्रदेशमध्ये दारुण पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला असून काँग्रेस पक्षश्रेष्ठींची नाराजी त्यांना भोवल्याचे बोलले जात आहे.
MP Politics
MP PoliticsEsakal
Updated on

मध्य प्रदेशमध्ये दारुण पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला असून काँग्रेस पक्षश्रेष्ठींची नाराजी त्यांना भोवल्याचे बोलले जात आहे.

मध्य प्रदेश विधानसभेचे निकाल हाती लागल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्याविषयी असलेली नाराजी आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. त्यांची कार्यशैली व अहंकार काँग्रेसच्या पराभवाला कारण ठरल्याचे उघडपणे बोलले जात आहे. मध्य प्रदेशातील बहुतेक उमेदवार कमलनाथ यांच्या सहमतीने निश्चित झाले होते. या उमेदवारांना यश मिळू शकले नाही.

त्याचप्रमाणे इंडिया आघाडीतर्फे सर्व पक्षांच्या नेत्यांची जाहीरसभा सहा ऑक्टोबरला भोपाळ येथे घेण्याचे मुंबईतील बैठकीत जाहीर करण्यात आले होते. परंतु ही जाहीरसभा कमलनाथ यांच्या नकारामुळे होऊ शकली नाही. यामुळे नाराज झालेल्या पक्षश्रेष्ठींनी कमलनाथ यांची ‘इनिंग’ आता नियंत्रित करण्याचे ठरविल्याचे दिसते.

कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असे संकेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिल्याचे समजते. तरुण पिढीकडे प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व देण्यावर विचार केला जाणार आहे. काही दिवसात कमलनाथ पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन राजीनामा देतील, असे बोलले जात आहे.

MP Politics
Gold Rate Today: रेकॉर्डब्रेक तेजीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण; काय आहे आजचा भाव?

काल (५ डिसेंबर रोजी) सायंकाळी साडेसात वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीवेळी काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल उपस्थित होते. या बैठकीत मध्य प्रदेशचे नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याचे आदेश कमलनाथ यांना दिले आहेत. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

MP Politics
मध्य प्रदेशातील पराभव जिव्हारी! कमलनाथ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

शिवराजसिंहांच्या भेटीनेही नाराजी

कमलनाथ यांनी निकालानंतर शिवराजसिंह चौहानांची भेट घेतली. यावरूनही पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याचे बोलले जात आहे. पराभवानंतर पक्षाच्या पराभवाचे चिंतन करण्याऐवजी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेटी घेणे पक्षश्रेष्ठीला आवडलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.