Smriti Irani: एक अकेला सब पर भारी ! भाजपच्या मुसंडीनंतर स्मृती इराणींकडून मोदींचा जुना व्हिडीओ ट्वीट

नुकतीच मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा राज्यातील निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार भाजपने मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसंडी मारली आहे.
Smriti Irani Tweet On Latest Election
Smriti Irani Tweet On Latest ElectioneSakal
Updated on

Smriti Irani on Assembly Election: देशभरात निवडणुकीचं वारं सध्या वाहत आहे. देशातील ४ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या विधानसभा निवडणुकींना लोकसभेची लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात होतं. रविवारी (दि.३ डिसेंबर) तीन राज्यांच्या निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती.

राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये भाजप आघाडीवर होतं. मतमोजणी सुरु असतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. इराणी यांनी एक ट्वीट केलंय ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयघोष केला.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहात केलेल्या जुन्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय की,'एक अकेला सब पर भारी!'. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मोदी सांगत आहेत की, 'देश बघतोय की एका एकटा माणूस किती जणांवर भारी ठरला आहे. या राजकारण करणाऱ्या लोकांमध्ये सामना करण्याची हिंमत नाहीये. ते वाचण्याचा रस्ता शोधताय.'

नोव्हेंबरमध्ये देशातील चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या ४ राज्यांपैकी ३ राज्यांतील निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होणार होता. त्यासाठीची मतमोजणी सुरु झाली आहे. यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे. तर मिझोरमच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल सोमवारी (दि. ४ डिसेंबर) जाहीर करण्यात येईल. (Latest Marathi News)

Smriti Irani Tweet On Latest Election
Madhya Pradesh CM candidate for BJP : मध्यप्रदेशमध्ये येणार का 'शिंदे सरकार', कोण होणार भाजपचा मुख्यमंत्री?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.