Anantnag Encounter: "PM मोदींवर भाजप कार्यकर्ते फुलं उधळत होते अन् काश्मीरमध्ये..."; राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

MP Sanjay Raut On BJP leaders showering flower on PM Modi same time 3 senior officers killed in an encounter in Jammu Kashmir
MP Sanjay Raut On BJP leaders showering flower on PM Modi same time 3 senior officers killed in an encounter in Jammu Kashmir
Updated on

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात काल (बुधवार) झालेल्या दहशतवादी चकमकीत लष्कराती कर्नल, एक मेजर आणि एक पोलीस उपअधिक्षक शहीद झाले. यादरम्यान जी२० परिषदेचे यश्स्वी आयोजन केल्यानंतर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा भाजप कार्यालयात पोहचले तेव्हा त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणतात, "जी२०च्या यशाचा काल उत्सव साजरा केला जात होता आणि भाजपचे कार्यकर्ते पंतप्रधान मोदींवर फुलांचा वर्षाव करत होते, आम्हाला वाटते की, हे जर खरंच यश आहे असं वाटत असेल तर फुलांचा वर्षाव केला पाहिजे. पण तेव्हाच काश्मीरमध्ये दहशतवादी आपल्या जवानांवर गोळ्यांचा वर्षाव करत होते. जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत तीन वरिष्ठ अधिकारी मारले गेले. दोन आर्मी ऑफिसर आहेत, एक डीएसपी आहेत.

MP Sanjay Raut On BJP leaders showering flower on PM Modi same time 3 senior officers killed in an encounter in Jammu Kashmir
Colonel Manpreet Singh : दोन चिमुकल्यांना मागे सोडून देशासाठी शहीद; कोण होते कर्नल मनप्रीस सिंह?

एकाच वेळी तीन अधिकारी शहीद झाल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती ठिक नसल्याच दिसून येतं. तिथे निवडणुका होत नाहीत, सरकारचं नियंत्रण नाहीये. जर तुम्ही व्यवस्था तयार केली आहे तर माग ही जबाबदारी केंद्राची आहे. पण आपण सतत दोन-तीन जवान शहीद झाल्याचं पाहायला मिळत आहे हे अस्वस्थ करणारं आहे, आणि तुम्ही इथं फुलं उधळत आहात. कोणत्या आनंदात? हे पाहून ऐकून दुखः होत नाही का?

MP Sanjay Raut On BJP leaders showering flower on PM Modi same time 3 senior officers killed in an encounter in Jammu Kashmir
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री यशस्वी! 17 दिवसांनी उपोषण थांबलं पण...

एकीकडे तुम्ही (भाजप) पीओके ताब्यात घेण्याबद्दल बोलत आहात आणि दुसरीकडे काश्मीरमध्ये दहशतवादी आपल्या जवानांना मारत आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत आहात. बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हाही सांगितलं होतं पाकिस्तानला मुंबईत आणि देशात क्रिकेट खेळू देणार नाही, हीच आमची भूमिका आहे असेही संजय राऊत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.