MRF Tyre Success Story: कधीकाळी फुगे विकणाऱ्या कंपनीने टायर बनवून शेअर्सच्या बाबतीत विक्रम केला

नवे उद्योग सुरू करणऱ्यांनी आदर्श घ्यावा अशीच आहे कंपनी
MRF Tyre Success Story
MRF Tyre Success StorySakal Digital 2.0
Updated on

MRF Tyre Success Story: टायर बनवणाऱ्या एमआरएफने विक्रम केलाय. अलीकडेच कंपनीच्या शेअर्सने एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे. MRF ही टायर बनवणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध असेल, पण एकेकाळी ही कंपनी लहान मुलांसाठी फुगे बनवण्यासाठी प्रसिद्ध होती.

1946 मध्ये सुरू झालेल्या MRF या कंपनीचे पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी आहे. मेमन मप्पिल्लई यांनी स्वातंत्र्यापूर्वी त्याचा पाया रचला. तेच मापिल्लई जे रस्त्यावर फुगे विकायचे.

फुग्यापासून सुरू झालेल्या या प्रवासातून ते इतकी उंची गाठतील याची कल्पनाही नव्हती. ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या मपिल्लईचे वडील एक यशस्वी उद्योजक होते. पण ज्या परिस्थितीत कंपनी सुरू केली ते आव्हानात्मक होते, तरीही त्यांनी हार मानली नाही.

MRF Tyre Success Story
टायरचा रंग काळाच का असतो? Color of Tyre

कठीण परिस्थितीत कंपनी सुरू झाली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा त्रावणकोरचा राजा स्वातंत्र्यलढ्यात सामील झाला तेव्हा त्याने मपिल्लईच्या वडिलांची संपत्ती जप्त केली. त्यामुळे वडिलांचा व्यवसाय ठप्प झाला. मात्र, परिस्थितीशी झुंज देत त्यांनी फुगा बनवणारी कंपनी सुरू केली.

कंपनीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, मपिल्लई यांनी स्वत: प्रत्येक दुकानात जाऊन फुगे विकण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदलली आणि नवीन मार्गाने व्यवसाय वाढवण्याच्या योजना आखल्या गेल्या. 1954 मध्ये रबर उत्पादनाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी संबंधित व्यवसाय सुरू केला.

1962 मध्ये रबर टायर्सचे उत्पादन सुरू केले. एमआरएफ टायर्सला देशात लोकप्रियता मिळू लागली. 1964 हे वर्ष कंपनीसाठी टर्निंग पॉइंट ठरले. त्याच वर्षी कंपनीने अमेरिकेत टायर निर्यात करण्यास सुरुवात केली.

MRF Tyre Success Story
Car Tyre : आता गाडीत हवा भरायची गरजचं नाही; आले खास टायर

कालांतराने कंपनीचा विस्तार होत गेला. एमआरएफने 1989 मध्ये स्पोर्ट्समध्ये प्रवेश केला. 1989 मध्ये, हॅस्ब्रो इंटरनॅशनल यूएसए या खेळण्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीशी हातमिळवणी केली. 1993 मध्ये, मपिल्लई यांना त्यांच्या व्यवसाय क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा बहुमान मिळवणारे मपिल्लई हे पहिले दक्षिण उद्योगपती आहेत.

लढाऊ विमान सुखोईचे टायर बनवले

कंपनीने 1973 मध्ये पहिले रेडियल टायर बनवले. यानंतर कंपनीने मागे वळून पाहिले नाही. एमआरएफच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 2007 मध्ये पहिल्यांदा एमआरएफने एक अब्ज अमेरिकन डॉलर्सचा व्यवसाय करून विक्रम केला. पुढील 4 वर्षात व्यवसाय 4 पटीने वाढला.

कंपनी सध्या वाहने, विमाने तसेच लढाऊ विमान सुखोईसाठी टायर बनवत आहे. MRF उत्पादने जगातील 65 देशांमध्ये पोहोचली आहेत.

MRF Tyre Success Story
Tyre Company : या टायर कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी...

गुंतवणूकदारांना फायदा झाला

एमआरएफच्या कंपनीने वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. NSE च्या वेबसाइटनुसार, 1991 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 11 रुपये होती. कंपनीच्या शेअर्सने 10 लाखांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी 2021 मध्येही कंपनीच्या शेअर्सने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. यानंतर कंपनी आपल्या कमाईमुळे अनेकदा चर्चेत आली होती.

MRF Tyre Success Story
CEAT Tyre : सीएट टायर कंपनीकडून समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या टायरची तपासणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.