MUDA Scam : ED कडून एफआयआर दाखल होताच मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने 14 भूखंडांचे खाते केले रद्द

Chief Minister Siddaramaiah wife BM Parvati : पार्वती यांनी आता स्वेच्छेने भूखंड परत केले आहेत. कायद्याचा विचार करून आम्ही पार्वती यांच्या नावाने असलेला १४ भूखंडांची विक्री करार रद्द केला.
Chief Minister Siddaramaiah wife BM Parvati
Chief Minister Siddaramaiah wife BM Parvatiesakal
Updated on
Summary

आता १४ भूखंड ‘मुडा’च्या अखत्यारीत आल्या आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत हे भूखंड इतरांसोबत शेअर करता येतील की नाही, याबाबत आम्ही कायदेतज्ज्ञांचे मत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्या पत्नी बी. एम. पार्वती (B. M. Parvati) यांनी मंगळवारी स्वतः म्हैसूरच्या उपनिबंधकांच्या कार्यालयात जाऊन त्यांना म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाने (मुडा) वाटप केलेल्या १४ भूखंडांचे खाते रद्द केले.

‘मुडा’ भूखंड वाटपप्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी (Lokayukta Police) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने (सक्तवसुली संचालनालय) एफआयआर दाखल केला. मुख्यमंत्र्यांची अडचण होत असल्याने त्यांच्या पत्नीने ‘मुडा’ला (Muda Scam) जागा परत केल्या.

Chief Minister Siddaramaiah wife BM Parvati
राहुल गांधींची प. महाराष्ट्रात राजकीय मशागत; सांगलीनंतर एकाच महिन्यात कोल्हापूर दौरा, नेमकं काय घडणार?

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पार्वती यांनी १४ भूखंड परत केल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘मुडा’ आयुक्त रघुनंदन म्हणाले की १४ भूखंड परत करण्यात आल्यानंतर आता १४ ही भूखंडांचे खरेदीपत्र रद्द करण्यात आले आहे. पार्वती यांनी स्वखुशीने येऊन जे दिले, ते आम्ही स्वीकारले आहे. ही बाब आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पार्वती यांनी आता स्वेच्छेने भूखंड परत केले आहेत. कायद्याचा विचार करून आम्ही पार्वती यांच्या नावाने असलेला १४ भूखंडांची विक्री करार रद्द केला. आता १४ भूखंड ‘मुडा’च्या अखत्यारीत आल्या आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत हे भूखंड इतरांसोबत शेअर करता येतील की नाही, याबाबत आम्ही कायदेतज्ज्ञांचे मत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तपास यंत्रणांना भूखंड ताब्यात घेतल्याची माहिती कळवू. भूखंड परत केल्यास ते परत घेता येतात, कायद्यात तसे नमूद आहे, असल्याचे रघुनंदन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.