Mughal Garden : मोदी सरकारने राष्ट्रपती भवन परिसरातील 'मुघल गार्डन'चे नाव बदलले, जाणून घ्या नवं नाव...

Mughal Garden
Mughal Garden
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवन परिसरात बनवलेल्या विविध प्रकारच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुघल गार्डनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सराकाने मुघल गार्डनचे नाव बदलले आहे. मुघल गार्डन आता 'अमृत उद्यान' या नावाने ओळखण्यात येईल.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘अमृत उद्यान’ ३१ जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले होत आहे. २६ मार्चपर्यंत ते खुले राहणार आहे. अमृत ​​उद्यान म्हणजेच मुघल गार्डनमध्ये फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून लोक येत असतात. 

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवन परिसरातील उद्यानाला अमृत उद्यान असे नाव दिले आहे. 

अमृत उद्यानमध्ये १३८ प्रकारचे गुलाब, १० हजार पेक्षा जास्त ट्यूलिप बल्ब आणि ७० विविध प्रजातींच्या सुमारे ५ हजार हंगामी फुलांच्या प्रजाती आहेत. हे उद्यान देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सर्वसामान्यांसाठी खुले केले होते. तेव्हापासून दरवर्षी वसंत ऋतूमध्ये हे उद्यान जनतेसाठी खुले केले जाते.

Mughal Garden
Pathaan : "शाहरुख खान मुस्लिम नाही, त्याला मारून टाका, पण..." ; कोणी दिला इशारा?

१५ एक्कर परीसरात पसरलेल्या मुघल गार्डन या उद्यानाची निर्मीती ब्रिटिश काळात झाली होती. हे गार्डन राष्ट्रपती भवनाचा आत्मा असल्याची कथा आहे. मुघल गार्डनचा एक भाग गुलाबांच्या विशेष प्रकारांसाठी ओळखला जातो. राष्ट्रपती भवन आणि मुघल गार्डन्सची रचना इंग्रज वास्तुविशारद सर एडवर्ड लुटियंस यांनी केली होती.

Mughal Garden
Australian Open 2023 : अरेना सबलेंका ऑस्ट्रेलियन ऑपनची नवी राणी; जिंकले पहिले वहिले ग्रँडस्लॅम

राष्ट्रपतींचे माध्यम उपसचिव नाविका गुप्ता यांच्या माहितीनुसार उद्यानात येणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी आता सर्व सर्व वनस्पती व झाडांजवळ क्यू आर कोड लावण्यात येईल. तसेच २० मार्गदर्शक येथे काम करतील. ते झाडे आणि वनस्पतींची माहिती देतील. 

Mughal Garden
Wasim Akram : हे काही गल्लीतलं क्रिकेट नाही... नजम सेठींच्या पवित्र्यावर अक्रम काय म्हणाला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.