अंबानींची पुढची पिढी व्यवसायात; मुकेश अंबानींनी दिल्या महत्वाच्या जबाबदाऱ्या

mukesh ambani handover plan jio to akash ambani retail for isha ambani and new energy anant reliance
mukesh ambani handover plan jio to akash ambani retail for isha ambani and new energy anant reliance
Updated on

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी दोन दशके जबाबदारी सांभाळल्यानंतर आता नव्या पिढीकडे नेतृत्व सोपवण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी कंपनीच्या ४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (RIL 45th AGM) संबोधित करताना त्यांनी तीन मुलांमध्ये जबाबदाऱ्या वाटून देण्याचे स्पष्ट संकेत दिले. मोठा मुलगा आकाश अंबानी याला आधीच रिलायन्स जिओची जबाबदारी देण्यात आली आहे आणि मुलगी ईशा अंबानी रिलायन्स रिटेलचा व्यवसाय पाहत आहे. या कार्यक्रमात संबोधित करताना मुकेश अंबानी यांनी सांगितले की, धाकटा मुलगा अनंत अंबानी रिलायन्सच्या नवीन ऊर्जा व्यवसायावर (Reliance New Energy Business) लक्ष केंद्रित करत आहे.

रिलायन्स समूहाचा व्यवसाय डिजिटल, रिटेल आणि एनर्जी कॅटेगरीनुसार विभागला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुकेश अंबानी यांनी एजीएममध्ये आपल्या भाषणात नवीन पिढीचे कौतुकही केले. नवी पिढी आत्मविश्वासाने कंपनीची कमान स्वत:च्या हातात घेत असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की आकाश आणि ईशा यांना अनुक्रमे जिओ आणि रिटेल व्यवसायात नेतृत्वाची भूमिका मिळाली आहे. दोघेही सुरुवातीपासूनच आमच्या ग्राहक व्यवसायात उत्साहाने सहभागी झाले आहेत. अनंतही मोठ्या उत्साहाने न्यू एनर्जी व्यवसायात सहभागी झाला आहे. तोही जामनगरमध्ये जास्त वेळ घालवत असतो. तिघांनीही माझ्या वडिलांची विचार सरणी आत्मसात केली आहे.

mukesh ambani handover plan jio to akash ambani retail for isha ambani and new energy anant reliance
Jio AIRFIBER : काय आहे हे अनोखे डिव्हाइस, कसे काम करेल? जाणून घ्या सर्व काही

महत्वाचे म्हणजे आकाश अंबानी हे जून जूनमध्ये जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड (Jio Platforms Ltd)ची सब्सिजियरी रिलायंस जिओ इंफोकॉम लिमीटेडचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. कालच्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांनी ईशा आणि अनंत यांच्या भूमिकांबाबत स्पष्ट संकेत दिले असले तरी त्यांना कोणत्या भूमिका मिळाल्या आहेत याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. मुकेश अंबानींबद्दल बोलायचे झाले तर ते रिलायन्स इंडस्ट्रीजसह जिओ प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष आहेत याशिवाय ते स्वतः सध्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे ​​नेतृत्व करत आहेत. आकाश आणि ईशा दोघेही ऑक्टोबर २०१४ पासून रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड आणि जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या संचालक मंडळावर आहेत.

mukesh ambani handover plan jio to akash ambani retail for isha ambani and new energy anant reliance
Jio चे दमदार रीचार्ज प्लॅन, फ्री ओटीटी सबस्क्रिप्शन मिळेल 150GB डेटा

काल झालेल्या एजीएम मध्ये देखील मुख्य घोषणा करण्याची जबाबदारी आकाश आणि इशा यांना सोपवली होती. आकाश अंबानी यांनी जिओ आणि 5G प्लॅनसंबंधी माहिती दिली. त्यांनी जिओ फायबर, 5G अल्ट्रा हाय लाइक स्पीड सर्व्हिस इत्यादींविषयी त्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की सर्व्हिस एग्रिकल्चर, हेल्थकेअर आणि शिक्षण क्षेत्रात लाखो लोकांच्या जीवनात प्रभाव पाडेल. त्यांनी सांगितले की आता ८० कोटी कनेक्टेड इंटरनेट डिव्हायसेस आहेत, 5G आल्यानंतर वर्षभरात त्यांची संख्या वाढून १.५ अब्जापेक्षा जास्त होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.