केंद्राच्या दोन विधेयकांना मुकेश अंबानींचा पाठिंबा, म्हणाले...

भारतीय अर्थव्यवस्थेवर क्रिप्टोकरन्सीच्या प्रभावाबाबत रिझर्व्ह बँकेने आधीच सरकारला सतर्क केले आहे.
forbes mukesh ambani
forbes mukesh ambaniEsakal
Updated on

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केंद्र सरकारच्या (Central Government) डेटा प्रायव्हसी आणि क्रिप्टोकरन्सी विधेयकाला (Data privacy & Crypto Currency Bill) पाठिंबा दिला आहे. मुकेश अंबानी यांच्या मते, भारत पुढील धोरणे आणि नियम लागू करत असून आपण योग्य मार्गावर असल्याचेही अंबानी यांनी म्हंटले आहे. दरम्यान, मुकेश अंबानी यांची टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा सरकार छोट्या गुंतवणूकदारांना संरक्षण देण्यासाठी क्रिप्टोकरन्सीबाबत संसदेत नवीन विधेयक मांडण्याच्या विचारत आहे.

forbes mukesh ambani
भारतात क्रिप्टो करन्सीसाठी दरवाजे बंद होणार नाहीत, समजून घ्या सर्वकाही...

सरकारचा खाजगी क्रिप्टोकरन्सीवर (Private Crypto Currency) बंदी घालण्याचा मानस असल्याचे मानले जात असून, भारतीय अर्थव्यवस्थेवर क्रिप्टोकरन्सीच्या प्रभावाबाबत रिझर्व्ह बँकेने आधीच सरकारला सतर्क केले आहे. तथापि, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या मते, ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे क्रिप्टोकरन्सीपेक्षा मजबूत आहे जे चलनाशिवाय अस्तित्वात असू शकते.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची केली प्रशंसा

मुकेश अंबानी यांनी क्रिप्टोकरन्सीशी संबंधित ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचीदेखील (Blackchain Technology) प्रशंसा केली आहे. “मी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर विश्वास ठेवतो आणि ते क्रिप्टोकरन्सीपेक्षा ते वेगळे आहे,” विश्वास आणि समान समाजासाठी हे तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे. त्याचा इतर मार्गांनी फायदा घेता येतो असे मत मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()