नक्वी बंगालचे राज्यपाल? भाजप खासदाराने अभिनंदन करीत डिलीट केले ट्विट

Mukhtar Abbas Naqvi Latest News
Mukhtar Abbas Naqvi Latest NewsMukhtar Abbas Naqvi Latest News
Updated on

नवी दिल्ली : मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांची पश्चिम बंगालचे (Bengal) राज्यपाल (Governor) म्हणून नियुक्ती केल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यापूर्वी भाजप खासदार हंसराज हंस यांनी याबाबत ट्विट केले. त्यांनी सर्वप्रथम मुख्तार अब्बास नक्वी यांचे पश्चिम बंगालचे राज्यपाल झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर काही वेळातच ट्विट डिलीट केले. (Mukhtar Abbas Naqvi Latest News)

बंगालचे (Bengal) विद्यमान राज्यपाल (Governor) जगदीप धनखर यांना एनडीएने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार बनवले आहे. अशा स्थितीत पद रिक्त झाल्यानंतर त्यांची जागा कोणालातरी घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत मुख्तार अब्बास नक्वी यांचे नाव आघाडीवर आहे. यापूर्वी नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांचेही नाव राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत होते. परंतु, एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली.

Mukhtar Abbas Naqvi Latest News
खासदारांबाबत दीपक केसरकरांचे मोठे विधान; म्हणाले...

‘केंद्र सरकारने मुख्तार अब्बास नक्वी यांची बंगालचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्याबद्दल अभिनंदन’ असे ट्विट भाजप (BJP) खासदार हंसराज हंस यांनी केले होते. काही वेळातच हंसराज हंस यांनी हे ट्विट डिलीट केले. जगदीप धनखर यांनीही बंगालच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे. मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन यांच्याकडे सध्या बंगालचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.