Mukhtar Ansari : ''कहानी खत्म नहीं हुई'' मुख्तार अन्सारीच्या भावाची धमकी; दहा वर्षानंतरही सुरक्षित राहणार मुख्तारचा मृतदेह

''मुख्तार अन्सारीचा मृत्यू नियोजित खून आहे. मेडिकल कॉलेजातील डॉक्टर, जेलमधील डॉक्टर, जेल प्रशासन, सरकारकडून साध्या ड्रेसवर असलेले एलआययू आणि एसटीएफचे लोक, यांनी पूर्ण नियोजन करुन मुख्तारचा खून केला.''
Mukhtar Ansari
Mukhtar Ansariesakal
Updated on

Mukhtar Ansari News : मुख्तार अन्सारीला विष देऊन मारल्याचा आरोप करणारे त्याचे भाऊ अफझाल अन्सारी यांनी सोमवारी, अजून विषय संपलेला नाही, असं म्हणत धमकी दिली आहे. मुख्तारचा मृतदेह अशा पद्धतीने दफण केलाय की पाच-दहा वर्षेही मृतदेह बाहेर काढला तरी तो पूर्ण सुरक्षित राहणार आहे, असं म्हटलं आहे.

मुख्तार अन्सारीसोबत अन्याय झाल्याच्या भावना अफझलच्या आहेत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशालासुद्धा जुमानलं नसून आयसीयूतून थेट जेलमध्ये कुणाला पाठवलं जात नाही. वॉर्डात ऑब्झर्वेशनसाठी ठेवलं जातं. परंतु मुख्तारला आयसीयूमधून जेलमध्ये पाठवल्याच्या आरोप त्याच्या भावाने केला आहे.

Mukhtar Ansari
Gyanvapi Mosque Case : सर्वोच्च न्यायालयाचा मुस्लिम पक्षाला मोठा झटका! व्यास तहखान्यात पूजा सुरूच राहणार

मागच्या मंगळवारी तुरुंगामध्ये प्रकृती बिघडल्याने मुख्तार अन्सारीला बांदा मेडिकल कॉलेजात दाखल करण्यात आलेलं होतं. येथे काही तास आयसीयूमध्ये उपचार घेतल्यानंतर त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात आलेलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याची प्रकृती बिघडली होती. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार केले. तिसऱ्या दिवशी प्रकृती इतकी बिघडली की त्याचा मृत्यूच झाला. हृदयविकाराने मृत्यू झाल्याचं डॉक्टारांनी सांगितलं.

माध्यमांशी बोलताना अफझल यांनी सांगितलं की, मृत्यूच्या काही तास अगोदर मुख्तार अन्सारीचं मुलगा उमर अन्सारी आणि सुन निखत यांच्यासोबत बोलणं झालं होतं. त्यांच्यातील झालेल्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो ऐका, असं अफझल यांनी सांगितलं.

''व्हिडीओमध्ये मुख्तार स्पष्टपणे म्हणतोय की, दहा दिवसांपासून न मोशन झाले न लघुशंका. स्वतःहून उठता-बसताही येत नाही. आयसीयूमधून थेट जेलमध्ये पाठवणारा डॉक्टर म्हणतोय की, त्यांची प्रकृती ठीक आहे. जर प्रकृती ठीक होती तर २४ तासांमध्ये मृत्यू कसा झाला?'' असा सवाल अफझल यांनी उपस्थित केला आहे.

Mukhtar Ansari
IPL 2024 : 'कोण जिंकलं काय फरक पडतोय मी इथं फक्त...' धोनीच्या तुफान खेळीनंतर जुने ट्विट व्हायरल

अफझल यांनी म्हटलं की, मुख्तार अन्सारीचा मृत्यू नियोजित खून आहे. मेडिकल कॉलेजातील डॉक्टर, जेलमधील डॉक्टर, जेल प्रशासन, सरकारकडून साध्या ड्रेसवर असलेले एलआययू आणि एसटीएफचे लोक, यांनी पूर्ण नियोजन करुन मुख्तारचा खून केला.

''पाच-दहा वर्षानंतर मृतदेहाची तपासणी करता येणार''

अफझलने थेट धमकीच्या आवेशात म्हटलं की, मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाला अशा पद्धतीने दफण करण्यात आलेलं आहे पाच-दहा वर्षांनंतर तपासणी करायचं म्हटलं तर तो मृतदेह कबरीतून बाहेर काढता येऊ शकेल. मुख्तारची कहाणी संपलेली नाही, आता सुरु झालीय. जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांच्याविरोधात ५० खटले दाखल केले आहेत, ही अन्यायाची परिसिमा आहे, असं अफझल यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.