Mukhtar Ansari: बाहुबली मुख्तार अन्सारीला दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा; 36 वर्षे जुने प्रकरण नेमकं काय आहे?

Mukhtar Ansari life imprisonment: माफिया मुख्तार अन्सारीला फसवणूक करुन डबल बॅरल बंदूकीचा परवाना मिळवल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Mukhtar Ansari
Mukhtar Ansariesakal
Updated on

नवी दिल्ली- माफिया मुख्तार अन्सारीला डबल बॅरल बंदूकीचा बनावट परवाना मिळवल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने माजी आमदार बाहुबली मुख्तार अन्सारीला आयपीसीच्या कलम ४२८, ४६७, ४६८, १२० बी आणि आर्म्स अॅक्टच्या कलम ३० अंतर्गत दोषी मानलं आहे. न्यायमूर्ती अवनीश गौतम यांनी हा निर्णय दिला आहे.

बांदा तुरुंगातून मुख्तार अन्सारी व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंग द्वारे सुनावणीला हजर होता. गेल्या दीड वर्षात मुख्तार अन्सारीला आठव्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. याआधी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अजय राय यांचे भाऊ अवधेश राय यांच्या हत्येप्रकरणात मुख्तार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. (Mukhtar Ansari gangster turned politician sentenced to life imprisonment fake arms licence case )

Mukhtar Ansari
Mukhtar Ansari: बाहुबली आमदार मुख्तार अन्सारीला १० वर्षांचा तुरुंगवास, पाच लाखांचा दंड; वाचा काय आहे प्रकरण

३७ वर्षे जुनं प्रकरण काय?

मुख्तार अन्सारीने १० जून १९८७ मध्ये डबल बॅरेल बंदूक परवाना मिळवण्यासाठी गाजीपूर जिल्हा मॅजिस्ट्रेटकडे अर्ज केला होता. या अर्जावर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि एसपीची खोटी स्वाक्षरी करण्यात आली होती. यात फसवणूक झाल्याचं समोर आल्यानंतर संबंधित यंत्रणेने ४ डिसेंबर १९९० मध्ये गाजीपूरच्या मुहम्मदाबाद पोलीस स्टेशनमध्ये मुख्यात अन्सारी, तत्कालीन उपजिल्हाधिकारी आणि अन्य पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली होती.

तपासानंतर तत्कालीन लिपिक गौरीशंकर श्रीवास्तव आणि मुख्तार अन्सारीच्या विरुद्ध १९९७ मध्ये कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान लिपिक गौरीशंकर श्रीवास्तवचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकट्या मुख्तार अन्सारी विरोधात खटला सुरु होता. याप्रकरणी माजी मुख्य सचिव आलोक रंजन, माजी डीजीपी देवराज नागर यांच्यासह १० जणांचा जबाब नोंदवून घेण्यात आला होता.

Mukhtar Ansari
Vaijapur Crime : पाच हजार घेऊन ‘ति’ला दिले नराधमाच्या तावडीत; वैजापुरातील महिलेचा कारनामा, दोघांवर गुन्हा दाखल

अन्सारीविरोधात याआधी सात प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातील तीन शिक्षा वाराणसी एमपी-एमएलए कोर्टाने सुनावल्या आहेत. रुंगटा कुटुंबाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याला १५ डिसेंबर २०२३ रोजी शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच १० हजार रुपयांचा दंड देखील सुनावण्यात आला होता. दरम्यान,कधीकाळी गँगस्टर असलेला अन्सारी राजकारणात आला होता. तो दोनवेळा बसपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.