Mukhtar Ansari: मुख्तार अन्सारीने योगी आदित्यनाथ यांना केलं होतं टार्गेट! कसा वाचला जीव? IPS अधिकाऱ्याने सांगितला थरारक अनुभव

Mukhtar Ansari: उत्तर प्रदेशातील मऊ येथील माजी आमदार गँगस्टर मुख्तार अन्सारी यांच्यावर मोहम्मदाबाद, गाझीपूर येथील कालीबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बांदा तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर मुख्तारचे पार्थिव कडेकोट बंदोबस्तात मोहम्मदाबाद येथे आणण्यात आले होते.
Mukhtar Ansari
Mukhtar Ansariesakal
Updated on

Mukhtar Ansari: माफिया डॉन मुख्तार अन्सारी याचा तुरुंगात मृत्यू झाला अन् त्याचे गुन्हेगारी जगतातील अनेक किस्से बाहेर यायला लागले.  मुख्तार अन्सारी तुरुंगातून देखील आपली दहशत माजवत होता. भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्तेनंतर मुख्तार अन्सारी चर्तेत आला.

न्यूज-18 ने आपल्या एका वृत्तात निवृत्त आयपीएस अधिकारी ब्रिज लाल यांचा हवाला देत 7 सप्टेंबर 2008 रोजी आझमगडमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. मुख्तार अन्सारी हा गुन्हेगारी जगतातील एक प्रसिद्ध आणि भयभीत चेहरा बनला होता.

2008 ची ही घटना आहे. योगी आदित्यनाथ गोरखूपचे खासदार होते. मुख्तार अन्सारीने केलेल्या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले होते. मुख्तार अन्सारीच्या टोळीने त्यांच्या ताफ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. आधी दगडफेक केली त्यानंतर पेट्रोल बॉम्ब फेकले आणि नंतर गोळीबार केला.

यावेळी योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. एका आयपीएस अधिकाऱ्यावर योगी आदित्यनाथ यांना बाहेर काढण्यासाठी जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी AK-47 आणि एक हेलिकॉप्टर देण्यात आले होते. यावरून मुख्तार अन्सारीच्या दहशतीचा अंदाज लावला जावू शकतो.

मुख्तार अन्सारी 2005 पासून तुरुंगात होता. त्याच्यावर ६० हून अधिक गुन्हे प्रलंबित आहेत. त्याची तब्येत बिघडल्याने त्यांना बांदा तुरुंगात ठेवण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी त्यांच्यावर गाझीपूरमधील महंमदाबाद दर्जी टोला येथे कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Mukhtar Ansari
Satara Lok Sabha : लोकसभेच्या रणांगणातून पवारांच्या दोस्ताची माघार; निष्ठावंतांकडून श्रीनिवास पाटलांची मनधरणी

 कसा वाचला जीव?

योगी आदित्यनाथ यांनी आझमगडमध्ये हिंदू युवा वाहिनीच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरोधात रॅली काढण्याची घोषणा केली होती. ते लाल रंगाच्या एसयूव्हीमध्ये प्रवास करणार होते. ४० वाहनांचा ताफा त्यांच्यासमोर होता. ताफा आझमगडला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर दगडफेक झाली. पेट्रोल बॉम्ब फेकले आणि गोळीबार करण्यात आला. मात्र योगायोग म्हणजे ऐनवेळी योगी यांनी त्यांगी गाडी बदलली होती. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. (UP Crime News)

Mukhtar Ansari
Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; तर 'या' भागात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.