Mukul Rohatgi : मुकुल रोहतगी होणार देशाचे नवे अ‍ॅटॉर्नी जनरल

रोहतगींची यापूर्वी जून 2014 मध्ये अ‍ॅटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
Mukul Rohatgi
Mukul Rohatgiesakal
Updated on
Summary

रोहतगींची यापूर्वी जून 2014 मध्ये अ‍ॅटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

नवी दिल्ली : मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांची भारताचे अ‍ॅटॉर्नी जनरल (Attorney General of India) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. त्यांचा दुसरा कार्यकाळ 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. रोहतगी केके वेणुगोपाल (KK Venugopal) यांची जागा घेतील, त्यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

रोहतगी यांची यापूर्वी जून 2014 मध्ये अ‍ॅटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि जून 2017 पर्यंत ते कार्यरत होते. रोहतगींची ही नियुक्ती दुसऱ्यांदा होत आहे. विद्यमान अ‍ॅटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांची सेवा 30 जून रोजी संपणार होती. मात्र, त्यांची सेवा वाढवण्यात आली. मुकुल रोहतगी 1 ऑक्टोबर 2022 पासून अ‍ॅटॉर्नी जनरल म्हणून त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू करतील.

Mukul Rohatgi
Supreme Court चा मोठा निर्णय; 3 उच्च न्यायालयांमध्ये 20 न्यायाधीशांच्या नियुक्तीला मंजुरी

रोहतगींची जून 2014 मध्ये अ‍ॅटॉर्नी जनरल म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. पहिल्या टर्ममध्ये रोहतगी जून 2017 पर्यंत कार्यरत होते. वेणुगोपाल यांनी नुकतेच सुप्रीम कोर्टात (Supreme Court) 30 सप्टेंबरनंतर पदावर राहणार नसल्याचे संकेत दिले होते. वेणुगोपाल यांचा कार्यकाळ या वर्षी जून अखेरीस तीन महिन्यांनी वाढवण्यात आला. मुदतवाढ मिळाल्यानंतर, त्यांचा अ‍ॅटॉर्नी जनरल म्हणून कार्यकाळ 30 सप्टेंबर 2022 रोजी संपणार आहे. वेणुगोपाल यांनी 1 जुलै 2017 रोजी मुकुल रोहतगी यांच्या जागी केंद्र सरकारचे सर्वोच्च कायदेशीर अधिकारी म्हणून प्रथम अ‍ॅटॉर्नी जनरल म्हणून पदभार स्वीकारला. सेवा संपल्यानंतर त्यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

Mukul Rohatgi
Pashu Aadhar : माणसांप्रमाणं आता म्हशींचंही बनणार आधार कार्ड; PM नरेंद्र मोदींची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.