मुंबईकर सर्वाधिक विसराळू; बर्थडे केक, आंबे....काहीही विसरतात!

गेल्या वर्षभरात भारतात मोबाईल फोन, स्पीकर्स किंवा हेडफोन्स, वॉलेट्स, बॅग्स या गोष्टी सर्वाधिक वेळा प्रवासी कॅबमध्ये विसरून गेले आहेत.
Items Left in Taxi
Items Left in Taxi Sakal
Updated on

देशातल्या सर्वात विसराळू शहरांमध्ये मुंबईनं पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल दिल्ली, लखनौ, कोलकत्ता हेही या यादीत वरच्या क्रमांकावर आहेत. उबरच्या लॉस्ट एँड फाऊंड इन्डेक्सतर्फे (Uber's Lost and Found Index 2022) करण्यात आलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. उबर या कॅब कंपनीने केलेल्या यादीमध्ये प्रवाश्यांनी कॅबमध्ये विसरलेल्या गोष्टींबद्दलची माहिती आहे.

घेवर ते आधार कार्ड, बासरी अशा अनेक गोष्टी प्रवासी उबर कॅबमध्ये विसरून जातात. स्टीकर्स, बर्थडे केक, आंबे, डम्बेल्स, क्रिकेटची बॅट, स्पाईक गार्ड, बाईकचा हँडल अशा अनेक गोष्टी प्रवासी कॅबमध्येच विसरून जातात. ६ जून रोजी उबरने लॉस्ट अँड फाऊंड इन्डेक्स प्रकाशित केला. त्यामध्ये त्यांनी मार्च २०२१ ते एप्रिल २०२२ या काळामध्ये प्रवासी विसरून गेलेल्या गोष्टींबद्दलचा अभ्यास प्रकाशित केला आहे. (Things left behind by indians in cabs)

Items Left in Taxi
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखील भारतीय चलनावर छायाचित्र यावे

या अभ्यासामध्ये आठवड्यातले कोणते दिवस प्रवाशांनी सर्वाधिक वेळा सामान विसरलंय, तसंच वर्षातून किती वेळा सामान प्रवासी कॅबमध्येच विसरतात, याचाही अभ्यास केलेला आहे. बहुतांश वेळा दुपारी प्रवासी आपलं सामान कॅबमध्ये विसरतात. या अभ्यासातून हेही समोर आलं आहे की, मार्च महिन्यामध्ये प्रवाशांनी सामान विसरण्याचं प्रमाण सर्वाधिक होतं.

गेल्या वर्षभरात भारतात मोबाईल फोन, स्पीकर्स किंवा हेडफोन्स, वॉलेट्स, बॅग्स या गोष्टी सर्वाधिक वेळा प्रवासी कॅबमध्ये विसरून गेले आहेत. त्याखालोखाल किराणा माल, थर्मस, पाण्याच्या बाटल्या, फोनचे चार्जर अशा गोष्टींचा नंबर लागलो. शनिवारी बहुतांश प्रवासी कपडे विसरून जातात. बुधवारी बहुतांश प्रवासी लॅपटॉप विसरून गेलेले आहेत. रविवारी पाण्याच्या बाटल्या तर सोमवारी आणि शुक्रवारी हेडफोन्स आणि स्पीकर्स विसरून जाण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.

Items Left in Taxi
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची रेल्वेमंत्र्यांकडून पाहणी, पाहा PHOTOS

वस्तू विसरण्याचं प्रमाण सर्वाधिक असणारे वर्षातले दिवस

  • २५ मार्च, २०२२

  • २४ मार्च २०२२

  • ३० मार्च २०२२

  • ३१ मार्च २०२२

  • १७ मार्च २०२२

भारतीयांसाठी वस्तू विसरण्याची वेळ- दुपारी १,२, ३

सर्वाधिक वेळा कॅबमध्ये विसरून गेलेल्या १० गोष्टी -

  • फोन किंवा कॅमेरा

  • लॅपटॉप

  • बॅग

  • पाकीट

  • स्पीकर

  • कपडे

  • किराणा माल

  • कॅश

  • पाण्याची बाटली

  • हेडफोन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.