नवी दिल्ली : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याचा ठावठिकाणा मुंबई पोलिसांना मिळाला आहे. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तो अमेरिकेत असल्याचे तपासात उघड झाले असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.