भारतीय क्रिकेट संघाने T20I विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर मुंबईत उत्सव साजरा होत असताना दुसरीकडे देशभरात या सामन्याची चर्चा सुरू असतानाच, मुंबई पोलीस कॉन्स्टेबल टीम इंडियाच्या विजय परेड दरम्यान त्याच्या एका "कामगिरी"मुळं "मॅन ऑफ द मॅच" ठरले.
आपली तत्परता दाखवत कॉन्स्टेबल सईद सलीम पिंजारी टीम इंडियाच्या विजय परेडमध्ये एका तरूणीचा जीव वाचवला. मरीनवरच्या मोठ्या आणि जल्लोषाच्या गर्दीत, कॉन्स्टेबल पिंजारी यांना एक बेशुद्ध तरूणी दिसली आणि तिला वाचवण्यासाठी त्यांनी तिला उचलून घेऊन ते गर्दीतून वेगाने बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या या तत्परतेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
T20 विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हजारो क्रिकेट चाहते मुंबईच्या प्रतिष्ठित मरीन ड्राइव्हवर आले होते. दरम्यान त्या मोठ्या गर्दीत महिलेला मदत करणाऱ्या त्या हवलदारांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
सईद सलीम पिंजारी यांनी त्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'मी बंदोबस्त करत असताना मला आणि माझ्यासोबत असलेल्या महिला कॉन्सेटबला एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तीला आम्ही उचलून मोकळ्या जागेत नेलं. जेणेकरुन तिला श्वास घ्यायला त्रास होणार नाही. तिला पाणी पाजले, तिला चॉकलेट दिले. तिची परिस्थिती स्थिर होईपर्यंत आम्ही तिथेच थांबलो. त्यानंतर रुग्णावाहीकेद्वारे तिला पुढील उपचारासाठी पाठवले. देवाची कृपा आणि आमच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणा , मला तेवढी शक्ती देवाने दिली आणि मी माझे कर्तव्य पार पडलं. मला गर्व आहे की, मी मुंबई पोलीस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.