मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बुल्ली बाई अॅपप्रकरणी (Bulli Bai Case) आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी महिला असून तिला उत्तराखंडवरून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी या महिलेच्या संपर्कात आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच बंगळुरूतील आरोपीला अटक केली असून न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
बुल्ली बाई अॅपवरून मुस्लीम महिलांना टार्गेट केले जाते. तसेच या महिलांचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावरून उचलून त्यांना ट्रोल करण्यात आले. या फोटोंचा बुल्ली बाई अॅपवरून लिलाव देखील करण्यात आला. याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चुतर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली असून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती. तसेच महाराष्ट्रातील इतर राजकीय नेत्यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर महिलांची बदनामी आणि सायबर क्राईमचा गुन्हा दाखल करत मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. सोमवारी एका २१ वर्षीय विद्यार्थ्याला बंगळुरूवरून ताब्यात घेण्यात आले.
महिला हाताळत होती ३ अकाऊंट -
मुख्य आरोपी महिला 'बुल्ली बाई' अॅपशी संबंधित तीन ट्विटर अकाऊंट हाताळत होती. सहआरोपी विशाल कुमारने खालसा वर्चस्ववादी नावाने खाते उघडले होते. ३१ डिसेंबर रोजी त्यांनी इतर खात्यांची नावे बदलली होती, असंही मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
तो आरोपी विशाल कुमार -
बंगळुरूमधून ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याची आज कसून चौकशी करण्यात आली. यामागे मोठी टोळी आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न देखील मुंबई पोलिसांनी केला. त्यामधून या मुलाचे नाव विशाल कुमार असून मुख्य आरोपी एक महिला असल्याचे समोर आले. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या एका पथकाने उत्तराखंडमधून महिलेला ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखत असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, बुल्ली बाई प्रकरणावरून दिल्ली महिला आय़ोगाने दिल्ली पोलिसांना सुनावले आहे. तसेच गेल्या वेळी सुल्ली डिल्स प्रकरणी तक्रार दाखल करूनही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. दिल्ली पोलिस गंभीर नसल्याचा आरोप देखील महिला आयोगाने यावेळी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.