Vada Pav: आमच्या वडापावची चव तुमच्या बर्गरला नाय रं... जगातील 50 बेस्ट सँडविचेसमध्ये मिळवलं स्थान

Mumbai Vada Pav ranked one of best sandwiches: वडापाव भारतातील लोकप्रिय स्ट्रिट फूड आहेच, पण त्याची आता जागतिक पातळीवर देखील दखल घेण्यात आली आहे.
vadapav
vadapavesakal
Updated on

Mumbai Vada Pav ranked- वडापाव खाल्ला नाही असा व्यक्ती किमान महाराष्ट्रात तरी आढळणं कठीण आहे. मुंबईतल्या व्यक्तीने तर वडापाव खालेल्ला नसणे म्हणजे दुर्मिळच. वडापाव भारतातील लोकप्रिय स्ट्रिट फूड आहेच, पण त्याची आता जागतिक पातळीवर देखील दखल घेण्यात आली आहे. आपला वडापाव भारी आहेच यावर जगानेच शिक्कामोर्तब केले आहे.

जगातील सर्वाधिक भारी ५० सँडविचेसच्या यादीमध्ये आपल्या मुंबईच्या वडापावने १९ वे स्थान मिळवले आहे. प्रसिद्ध फूड अँड ट्रव्हल गाईड TasteAtlas ने सर्वात प्रसिद्ध सँडविचेसची यादी जाहीर केलीये. यात वडापावला देखील स्थान आहे. त्यामुळे भारताच्या स्ट्रिट फूडसाठी ही एक मोठी घटना आहे. वडापावच्या लोकप्रियतेला आणि चविला एकप्रकारे मान्यताच मिळाली आहे.

vadapav
Nashik News : वडापाव विक्रेत्याने रचले ‘बन गया मंदिर राम का’ गीत; चित्रबद्ध केलेले गाणे व्हायरल

वडापाव कसा बनवतात तुम्हाला माहितीच असेल!

बेसनाच्या पीठात बटाट्याची भाजी टाकून तयार केलेला वडा पावमध्ये टाकून दिला जातो. त्यासोबत चटणी, सॉस आणि मिरची-कांदा दिल्यास वडापावच्या चवीला तोडच राहत नाही. स्वस्त आणि मस्त असलेला वडापाव सर्वसामान्यांच्या आवडीचा आहे. देशातील, राज्यातील विशेषत: मुंबईतील लोकांसाठी वडापाव हा आवडीचा पदार्थ आहे.

vadapav
Raj Thackeray : सकाळी भेट अन् संध्याकाळी टोमणा; ''एकनाथ शिंदे म्हणजे 'वडापाव'मधला वडा...''

वडापावची सुरुवात कशी झाली

TasteAtlas च्या दाव्यानुसार, वडापावची सुरुवात अशोक वैद्या यांनी केली होती. ते १९६० आणि १९७० च्या दशकात मुंबईतील रेल्वे स्टेशनवर वडापाव विकत होते. गरीब लोकांसाठी पोट भरण्यासाठी एक स्वस्त पदार्थ असावा असा त्यांचा विचार होता. त्यानंतर वडापाव मुंबईकडे सगळीकडे विकला जाऊ लागला. हळूहळू तो महाराष्ट्रात देखील पाहायला मिळू लागला. भारतातील काही शहरात देखील वडापाव मिळतो. मुंबईतील काही ठिकाणं वडापावसाठी प्रसिद्ध आहेत. (Latest Marathi News)

TasteAtlas कडून विविध देशांमधील ५० पदार्थांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात भारताच्या वडापावचा समावेश असणे मोठी गोष्ट आहे. TasteAtlas कडून दरवर्षी अशा प्रकारची यादी जाहीर केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.