बेंगलुरु: आपल्या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) याच्या बेंगलुरुमधील शोला दिलेली परवानगी नाकारण्यात आली आहे. रविवारी पोलिसांनी त्याबाबत पत्र लिहून शो रद्द करण्याचे विनंती केली आहे. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत आयोजकांना हा शो रद्द करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर मुनव्वर फारुकी यांने 'द्वेष जिंकला, कलाकार हारला' अशा शब्दात आपला शो रद्द केला असल्याचं त्याच्या चाहत्यांना कळवलं आहे.
पोलिसांनी मुनव्वर फारुकीचे मागेच काही शो पाहिल्यानंतर त्यातील धर्माबद्दल असलेली वक्तव्ये पाहून हा शो रद्द करण्याची मागणी केली होती. मुनव्वर फारुकी यांचा लेटेस्ट शो 'डोंगरी टू नोवेअर' आज रविवारी गुड शेफर्ड ऑडीटोरियममध्ये होणार होता.
काय म्हणाला मुनव्वर?
शो रद्द करावा लागल्यानंतर मुनव्वर फारुकी याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय की, द्वेष जिंकला, कलाकार हारला आहे. मी थकलोय आता. गुड बाय. अन्याय. याआधी मुनव्वरला आपल्या एका वक्तव्यामुळे सुमारे महिनाभर तुरुंगाची हवा खावी लागली होती. हिंदू देव देवतांचा अपमान केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच कारणास्तव गेल्या अनेक महिन्यांतील त्याचे शो रद्द करण्यात आले आहेत.
पोलिसांनी पत्रात काय म्हटलंय?
पोलिसांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, आम्हाला असं आढळलंय की, मुनव्वर फारुकी एक वादग्रस्त व्यक्ती आहेत. धर्म आणि देवांच्या विरोधात त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने याआधी केली आहेत. अशी विश्वासार्ह माहिती आहे की अनेक संस्था या स्टँडअप कॉमेडी शोला विरोध करतात आणि यामुळे अराजकता निर्माण होऊ शकते आणि सार्वजनिक शांतता आणि सौहार्द बिघडू शकते ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर अनेक शहरांमध्ये त्यांच्या कॉमेडी शोवर प्रतिंबध लादण्यात आला आहे. सोबतच त्यांच्याविरोधात मध्यप्रदेशातील तुकोगंज पोलिस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे. याशिवाय इतर अनेक राज्यांमध्ये देखील खटले दाखल आहेत. त्यामुळे हा शो रद्द करण्यात यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.