महापालिका निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार; सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निर्देश

पावसाळ्यात निवडणुका घेण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणुकाला निर्देश दिले.
Supreme Court on Municipal Corporation Elections
Supreme Court on Municipal Corporation Electionsesakal
Updated on

नवी दिल्ली : राज्यातील रखडलेल्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला जिथं पाऊस नसेल तिथं निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळं पावसाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका टप्प्याटप्प्यानं होण्याची शक्यता आहे. (Municipal Corporations elections to be held in phases SC hearing begins)

Supreme Court on Municipal Corporation Elections
"मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला ठाम विश्वास

ओबीसी आरक्षणामुळं राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सध्या सुप्रीम कोर्टात निवडणुकांबाबत सुनावणी सुरु आहे. जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुका जाहीर कराव्यात असंही कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला सुचवलं आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला हरकत नाही, असंही कोर्टानं म्हटलं आहे.

Supreme Court on Municipal Corporation Elections
भारताचा घाऊक महागाईचा दर 15.08 टक्क्यांवर; 9 वर्षातील उच्चांक

येत्या काही दिवसांत पावसाळा सुरु होईल याच दरम्यान राज्यातील निवडणुका पार पडणार आहेत. पण निवडणुकांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी पाऊस नसेल तिथं निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? असं कोर्टानंच विचारल्यानं जिथे पाऊस नसेल तिथं आधी निवडणुका होण्याची शक्यता आहे तर जिथं पाऊस असेल तिथं नंतर निवडणुका घेतल्या जाऊ शकतात.

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं याआधीच्या सुनावणीवेळीच राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिले होते की, ओबीसी आरक्षणाविना दोन आठवड्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर करावी. त्यानंतर राज्यातील १४ महापालिकांच्या प्रभाग रचना अंतिम करण्याची सध्या लगबग सुरु आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेनं नुकतीच अंतम प्रभाग रचना जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.