बारा वर्षांपूर्वी, वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी एक तरुण अशा गुन्ह्यात अडकला जो त्याने केला देखील नव्हता. यूपीतील मेरठमध्ये एका तरुणाने अत्यंत कठिण परिस्थितीतही हिंमत सोडली नाही आणि स्वत:ला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरुच ठेवले. त्याच्यावर पोलिस हवालदाराच्या हत्येचा आरोप होता.
या आरोपाखाली त्यांना सुमारे अडीच वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. यावेळी एकटा पडलेल्या या तरुणाने वाईट परिस्थिती असतानाही आपला लढा सुरूच ठेवला. कायद्याचे शिक्षण घेऊनही त्यांनी स्वत:ची केस लढवली आणि स्वत:ला निर्दोष सिद्ध केले.
अमित चौधरी असे या तरुणाचे नाव आहे. मूळची बागपतच्या किरठल गावचा रहिवासी असलेल्या अमितची कहाणी प्रेरणा देणारी असून प्रतिकूल परिस्थितीला सामोरे गेलेल्या तरुणांसाठी ही कथा चांगलं उदाहरण ठरू शकते
12 ऑक्टोबर 2011 रोजी थानाभवनमधील मस्तागड गावातील पुलावर एक लाख रुपयांचे बक्षीस असलेला गुंड सुमित कैल याने पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. त्याने पोलिसांच्या रायफली लुटल्या. या घटनेत एका जवानाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. त्या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी संपूर्ण परिसर सील केला होता. या प्रकरणी पोलिसांनी 17 जणांवर खून आणि सरकारी शस्त्रे लुटल्याचा गुन्हा दाखल केला होता.
अमित याने सांगितलं की, त्यावेळी त्याचे वय साडेअठरा वर्षांच्या आसपास होते. या वयात तरुणाई आपल्या भविष्याची स्वप्ने पाहत असते. लष्करात भरती होण्याचं अमितचं स्वप्न होतं. त्याची तयारीही तो करत असे. अमितला एनसीसी सी प्रमाणपत्र मिळाले होते. त्याचा ध्येय ठरलं होतं.
अमित सांगतो की त्याची चूक एवढीच होती की तो घटनेच्या ठिकाणाजवळ असलेल्या बहिणीच्या सासरी गेला होता. निरपराध असूनही अमितच्या बोलण्यावर कुणाचाच विश्वास बसला नाही. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. या घटनेनंतर त्यांच्या प्रियजनांच्या नजरा ही अमितबद्दल बदलल्या. लोक त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहू लागले.
अमितने सांगितलं की त्यांच्यावर रासुका देखील लावण्यात आला होता जो नंतर काढून टाकण्यात आला. जामिनावर सुटल्यानंतर तो घरी पोहोचला तेव्हा त्याला कोणीही जवळ घेतलं नाही. अमित या परिस्थितीमुळे खचून गेला पण त्याने हिंमत सोडली नाही.
अमित सांगतो की त्याच्या प्रियजनांनी पाठिंबा दिला नाही पण काही लोकांनी मदत देखील केली. अशा लोकांनी नेहमीच हिंमत दिली. त्यानंतर तो गुरुग्रामला निघून गेला. तेथे त्यांने एका वकिलाकडे महिन्याला तीन हजार रुपये पगारावर काम केले. रस्त्यावर कॅलेंडर विकले. या दरम्यान त्याला अनेकदा उपाशी देखील झोपावं लागलं.
अनेकदा तो धार्मिक कार्यक्रमांमध्ये जाऊन जेवत असे. कठीण परिस्थितीमुळे तीन वर्षांत पूर्ण व्हायला हवे असलेलं अमितचे ग्रॅज्युएशन सहा वर्षांत पूर्ण झालं. 2015 मध्ये बीए केल्यानंतर त्याने मेरठ विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केली. 2018 मध्ये एलएलबी पूर्ण केल्यानंतर त्याने मुजफ्फरनगर कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात स्वतःची बाजू मांडण्यास सुरुवात केली. स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्याने पुरावे गोळा केले. या दरम्यान, त्यांनी एलएलएमही केलं.
अखेर तो दिवसही उजडला जेव्हा अमितला स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यात यश मिळालं. सप्टेंबर 2023 मध्ये न्यायालयाने त्याची हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. अमित आता नेटची तयारी करत आहे. या महिन्यात त्याची परीक्षा आहे. अमित सांगतो की त्याला आता प्रोफेसर व्हायचे आहे आणि त्यासाठी तो मेहनत घेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.