कर्नाटकात ‘विहिंप’च्या कार्यकर्त्याची हत्या; हिजाब वादाशी संबंध?

murder case
murder casemurder case
Updated on

शिंपी म्हणून काम करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या युवा शाखा बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा (२६) याची अज्ञात व्यक्तींनी खून (Murder) केला. त्याच्या हत्येनंतर राज्यभर तणावाचे वातावरण आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा येथे तणावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदीही घातली आहे. याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

हल्लेखोरांनी हल्ला करण्यापूर्वी कारमधून हर्षा याचा पाठलाग केला होता. हल्ल्यानंतर हर्षाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू (Murder) झाला. हत्येनंतर संतप्त जमावाने काही वाहनांची जाळपोळ कोली. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू करण्यात आली आहे. मंगळवारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे शिवमोग्गा पोलिस अधीक्षक बीएम लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले.

murder case
उभा ट्रेलर पाहून चालक घाबरला अन् तागडे कुटुंबाला मृत्यूने कवटाळले

हत्येनंतर परिसरातील अनेक वाहने जाळण्यात आली. आग विझवण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. प्रशासनाने सार्वजनिक मेळाव्यावर बंदी घातली आहे. शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बंदी असतानाही मृतदेह घरी नेताना बजरंग दलाच्या समर्थकांचा मोठा जमाव होता. याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक (Three accuse Arrested) करण्यात आली आहे.

हिजाब प्रकरणाशी संबंध नाही

आतापर्यंतच्या तपासात हत्या (Murder) आणि हिजाब वाद यांच्यातील कोणताही संबंध समोर आलेला नाही. हिजाब प्रकरणाचा या घटनेशी काहीही संबंध नाही. ही हत्या वेगळ्या कारणामुळे घडली. शिवमोग्गा हे संवेदनशील शहर आहे, असे राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले.

कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई यांनी सांगितले की, पोलिसांना काही सुगावा लागला असून, त्यावर काम सुरू आहे. कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी राज्य काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांच्यावर हिजाबच्या निषेधावर टिप्पणी करून हत्येला चिथावणी दिल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.