नागालँडच्या मोन जिल्ह्यात दहशतवादी समजून नागरिकांवर गोळीबार (Nagaland Civilian Death) करण्यात आला. यामध्ये मृतांचा आकडा वाढून १४ वर पोहोचला आहे. त्यानंतर नागालँड सरकारने शनिवारी सायंकाळी घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन केले असून याप्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
सदर घटनेमुळे मोन जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले असून मोबाईल इंटरनेट, मोठ्या प्रमाणात संदेशवहन सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. तसेच या घटनेनंतर कोहिमा येथील प्रसिद्ध हॉर्नबिल उत्सव थांबविण्यात आला आहे. लष्कराने एक निवेदन जारी करून जीवितहानी "दुर्दैवी" असल्याचे काल म्हटले होते. तसेच या घटनेची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू असून कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे त्यात म्हटले आहे. मृतांचे शवविच्छेदन सोम जिल्ह्यात केले जात आहे आणि मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. कारण जखमींपैकी किमान दोन गंभीर आहेत आणि त्यांना आसाममधील रुग्णालयात हलविण्यात आले असून उर्वरीत जणांवर सोम जिल्ह्यात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
संतप्त जमाव आणि लष्कर यांच्यात चकमकी झाल्याच्या बातम्या काही स्थानिक माध्यमांनी दिल्या आहेत. बेशिस्त जमावाने आर्मी बेस कॅम्पमध्ये घुसून सैन्यावर शारीरिक हल्ले करण्यास सुरुवात केली. सैन्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यामुळे यामध्ये काही नागरिक जखमी झाले, तर दोन सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले, असे या वृत्तामध्ये म्हटले आहे. या घटनेचे देशभरातून तीव्र पडसाद उमटले असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे, असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.