बेंगळुरू : द्वेषपूर्ण भाषण केल्यानंतर कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील २० वर्षीय मुस्लिम तरुणाची हत्या (Murder of a Muslim youth) करण्यात आली होती. या हल्ल्यात त्याचा मित्र जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी बजरंग दलाच्या (Bajrang Dal) सदस्यासह चार जणांना अटक केली (Four arrested) आहे. समीर शाहपूर असे मृताचे नाव आहे, तर शमसीर खान पठाण असे जखमी युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या नरगुंड परिसरात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात सुमारे दोन महिन्यांपासून जातीय संघर्ष सुरू आहे. दोन्ही समुदाय एकमेकांना चिथावणी देण्यासाठी शाळा आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांचा वापर करीत आहेत, असे गदगचे पोलिस अधीक्षक (एसपी) शिवप्रकाश देवराजू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नोव्हेंबरमध्ये दोन्ही समुदायांतील व्यक्तींविरुद्ध अनेक गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी झालेला हल्ला देखील जातीय संघर्षातून (Murder of a Muslim youth) झाला असावा. सोमवारी सकाळी बजरंग दलाचे (Bajrang Dal) सदस्य जातीय दंगलीसाठी सदस्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ पोलिस ठाण्यात आले होते. शाहपूरच्या मृत्युप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. मल्लिकार्जुन हिरेमठ (२०) चन्नाबसप्पा अक्की (१९), सक्रप्पा काकनूर (१९) आणि संजू नलावाडी (३५) अशी अटकेतील आरोपींची (Four arrested) नावे आहेत. पोलिस इतर आरोपींचा शोध घेत असल्याचे एसपी देवराजू म्हणाले.
गदगमधील सदस्यांशी बोलत आहे
आम्ही घटनेची माहिती घेत आहो. गदगमध्ये आमचे कार्यकर्ते आणि मुस्लिम यांच्यात किरकोळ मारामारी होत असल्याची मला माहिती मिळाली आहे. यावर काहीही बोलण्यापूर्वी माहिती घेणे गरजेचे आहे. गदगमधील सदस्यांशी बोलत आहे, असे द प्रिंटशी बोलताना बजरंग दलाचे अखिल भारतीय सह-संयोजक सूर्यनारायण म्हणाले.
अतिरिक्त पोलिस तैनात
मंगळवारी दोन्ही समुदायांमध्ये शांतता बैठका घेण्यात आल्या. जातीय भडका होऊ नये म्हणून नरगुंडमध्ये अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. नरगुंडमध्ये बुधवारी पोलिसांचा फ्लॅग मार्चही काढण्यात आला.
माझा भाऊ हल्लेखोरांना ओळखतही नव्हता
दोन महिन्यांपूर्वी मुलीच्या प्रकरणावरून मुस्लिम आणि हिंदू यांच्यात भांडण (Murder of a Muslim youth ) झाले होते. त्या घटनेपासून आरएसएस-बजरंग दलाचे (Bajrang Dal) सदस्य जमेल तेव्हा मुस्लिम तरुणांवर हल्ले करीत आहेत. माझ्या भावाचा त्या घटनेशी किंवा त्याला मारणाऱ्या लोकांशी काहीही संबंध नाही, असे शाहपूरचा भाऊ मोहम्मद जुबेर याने बुधवारी द प्रिंटला सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.