'राजस्थानमध्ये पुन्हा गुंडाराज'; करणी सेनेच्या प्रमुखाच्या हत्येवरुन राज्यात बंदची हाक

राष्ट्रीय करणी राजपूत सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर वातावरण तापले आहे. करणी सेनेकडून बुधवारी राजस्थान बंदची हाक देण्यात आली आहे.
murder of Karni Sena chief Sukhdev Singh Gogamedi who was shot dead Karni Sena called Rajasthan bandh on Wednesday
murder of Karni Sena chief Sukhdev Singh Gogamedi who was shot dead Karni Sena called Rajasthan bandh on Wednesday
Updated on

जयपूर- राष्ट्रीय करणी राजपूत सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर वातावरण तापले आहे. करणी सेनेकडून बुधवारी राजस्थान बंदची हाक देण्यात आली आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीचा दोन दिवसांपूर्वी निकाला लागला. यात काँग्रेसचा पराभव झाला असून भाजपचा विजय झालाय. आता करणी सेनेच्या अध्यक्षांच्या हत्येवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.(murder of Karni Sena chief Sukhdev Singh Gogamedi who was shot dead Karni Sena called Rajasthan bandh on Wednesday)

गोगामेडी यांच्या हत्येनंतर भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक हरल्याचा बदला म्हणून काँग्रेसची ही योजना होती. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहझाद पुनावाला यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात ते म्हणताहेत की पोलिसांना गोगामेडी यांच्या हत्येच्या शक्यतेची टीप मिळाली होती. पण, काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली.

murder of Karni Sena chief Sukhdev Singh Gogamedi who was shot dead Karni Sena called Rajasthan bandh on Wednesday
Karni Sena President Death : राजपूत करणी सेना अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या; लाँरेन्स बिश्नोई गँगने दिली होती धमकी

गोगामेडी यांच्या घरात तीन हल्लेखोरांनी प्रवेश केला होता. चर्चा सुरु असतानाच त्यांनी हल्ला केला आणि गोगामेडी यांच्यावर गोळ्या चालवल्या.यात त्यांचा मृत्यू झालाय. सदर घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. गोगामेडी यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. तर, एका हल्लेखोराचा प्रतिहल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. सदर घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेते अशोक गेहलोत, सचिन पायलट, भाजप नेत्या वसुंधरा राजे, राजवर्धन राठोड यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. भाजप सत्तेत येणाच गुंडाराज सुरु झाला अशी टीका काँग्रेस नेत्या सुप्रिया सिंधिंया यांनी केली आहे.

करणी सेनेने बुधवारी बंदची हाक दिली असून आरोपींना तात्काळ पकडण्याची मागणी केली आहे. भाजप प्रवक्ते पुनावाला म्हणाले की, भाजपला बदनाम करण्यासाठी काँग्रेस राज्यात कट रचत आहे. त्यातुनच हा प्रकार घडवण्यात आला आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.