Shraddha Walkar : "...याची मला आता खंत वाटते", श्रद्धा वालकरच्या वडिलांचं भाष्य; हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण

मुलीच्या हत्याकांड प्रकरणाची आपल्याकडं चार महिन्यांपासून खबर नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
shraddha Walkar Murder Case
shraddha Walkar Murder Caseesakal
Updated on

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाला आता वर्ष झालं आहे. पण या खटल्यात सध्या काय सुरु आहे, याबाबत आपल्याकडं कुठलीही अपडेट नाही, असं पीडित वालकर कुटुंबानं म्हटलं आहे. श्रद्धाच्या वडिलांनी या प्रकरणाच्या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Murder of Shraddha Walkar in Delhi Father fears case has gone cold)

shraddha Walkar Murder Case
Amitabh Bachchan: "तुमच्या प्रतिभेचं, कर्तुत्वाचं प्रतिबिंब..."; फायनलमधील पराभवानंतर महानायकाचं ट्वीट चर्चेत

अद्याप अंत्यसंस्कार नाहीत

श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी म्हटलं की, श्रद्धा गेल्यानंतर आम्ही अद्याप तिचे कुठलेही अंत्यसंस्कार केलेले नाहीत किंवा पुजा केलेली नाही. अंत्यसंस्कारांसाठी श्रद्धांच्या शरिराचे अवशेष पोलिसांकडून मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण ते अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळं ही केस थंडावल्याचं दिसून येत आहे.

श्रद्धाचा मारेकरी तिचा मित्र अफताब पुनावाला याच्याविरोधातील पुराव्यांबाबत बोलताना तिचे वडील म्हणाले, माझी मुलगी गोड आणि महत्वाकांक्षी होती जिचा या नराधमानं खून केला. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मला या केसच्या अपडेटबाबत पोलिसांकडून आणि कोर्टाकडून कुठलाही फोन आलेला नाही. (Latest Marathi News)

shraddha Walkar Murder Case
World Cup 2023: बालिश! फायनलसाठी कपिल देव यांना निमंत्रण न दिल्यानं काँग्रेसचा BCCIवर हल्लाबोल

मी संवाद साधू शकलो नाही याचं वाईट वाटतं

दरम्यान, श्रद्धा जेव्हा जीवंत होती तेव्हा मी तिच्याशी योग्य संवाद साधू शकलो नाही याचं वाईट वाटतं, असंही आता विकास वालकर यांनी म्हटलं आहे. मी या केसबाबत बराच विचार करतो आहे पण आता पुढे काय करायचं हे मला खरंच कळत नाहीए. मी गेल्या अनेक महिन्यांपासून जिथं हे हत्याकांड घडलं त्या दिल्लीला गेलेलो नाही. (Latest Marathi News)

shraddha Walkar Murder Case
World Cup 2023: बालिश! फायनलसाठी कपिल देव यांना निमंत्रण न दिल्यानं काँग्रेसचा BCCIवर हल्लाबोल

पोलिसांचं म्हणणं काय?

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "या प्रकरणाची चौकशी आता पूर्ण झाली असून सर्व पुराव्यांसह आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सध्या कोर्टाकडून याप्रकरणात जबाब नोंदवले जात आहेत. आमच्याकडं या प्रकरणातील सर्व पुरावे आहेत" (Marathi Tajya Batmya)

shraddha Walkar Murder Case
Ind vs Aus Final: ती सन्मानाची बाब... वर्ल्डकप फायनलनंतर टीम इंडियासाठी शाहरुखची पोस्ट

काय होती घटना?

श्रद्धा वालकर (वय २७) या मुंबईतील तरुणीची हत्या तिचा पार्टनर अफताब पुनावाला (वय २८) यानं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये क्रूर पद्धतीनं हत्या केली होती. दिल्लीतल्या छत्तरपूर भागातील आपल्या घरात त्यानं १८ ते २० मे दरम्यान श्रद्धीचा खून करुन तिच्या शरिराचे तुकडे केले. करवत आणि धारदार सुऱ्यानं त्यानं हे तुकडे केले. तसेच हे तुकडे त्यानं दिल्लीतील विविध भागात टाकून दिले होते.

दरम्यान, ऑक्टोबर २०२२ मध्ये श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पोलिसांत आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. कारण तिचा फोन लागत नसल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. अफताब पुनावाला सोबत रिलेशनशीपममध्ये असल्यानं बापलेकीमध्ये जास्त संवाद होत नव्हता. त्यानंतर नोव्हेंबर हे भयानक प्रकरण उघडकीस आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.