Latest New Delhi News: ‘‘विकसित भारताच्या ध्येयपूर्तीमध्ये हवाई वाहतूक क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे देशाल जगातील सर्वांत मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ बनवण्याच्यादृष्टिने नवीन विमानतळे, नवे हवाई रस्ते निर्माण करण्याचे आणि नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याचे काम प्रगतिपथावर आहे,’’ असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.