Ustad Rashid Khan Died: उस्ताद राशिद खान यांचे वयाच्या 55 व्या वर्षी निधन

संगीत उस्ताद म्हणून ओळखले जाणारे उस्ताद रशिद खान यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले आहे. उस्ताद रशिद खान हे काही काळापासून कर्करोगाची झुंजत होते. त्यांच्यावर कोलकातामधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
Ustad Rashid Khan Died
Ustad Rashid Khan Died
Updated on

नवी दिल्ली- संगीत सम्राट म्हणून ओळखले जाणारे उस्ताद राशिद खान यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले आहे. उस्ताद राशिद खान हे काही काळापासून कर्करोगाची झुंजत होते. त्यांच्यावर कोलकातामधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे. (Music maestro Ustad Rashid Khan passes away at the age of 55)

उस्ताद राशिद खान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बदायू मध्ये झाला होता. सुरुवातीला त्यांनी आपले आजोबा उस्ताद निस्सार हुसैन खान (१९०९-१९९३) यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे ते पुतणे होते. गुलाम मुस्तफा खान यांनी त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना मुंबईत मध्ये संगीत शिक्षण देण्यास सुरुवात केली होती.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. उस्ताद राशिद खान हे रामपूर सहास्वान घराण्याशी संबंधित होते. ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या की, मला त्यांच्या निधनाची बातमी कळाली. ही सर्व देश आणि सर्व संगीत विश्वासाठी मोठी हानी आहे. मला खूप दु:ख होत असून ते आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही.

Ustad Rashid Khan Died
Ustad Rashid khan passed away : पंडित भीमसेन जोशींची भविष्यवाणी राशिद खान यांनी खरी ठरवली!

आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न केले. पण, त्यांनी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांना अखेरचा श्वास घेतला अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली. उस्ताद राशिद खान यांच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. (Marathi Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.