वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेला वाद आता मुघलांच्या राण्यांपर्यंत पोहोचला आहे. भारतातील मुस्लिमांचा मुघलांशी कोणताही संबंध नाही. मग मुघल सम्राटांच्या पत्नी कोण होत्या हे सांगा, असा प्रश्न एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी विचारला होता. त्यांच्या या वक्तव्यावर मुस्लिम धर्मगुरू (Muslim cleric) चांगलेच संतापले आहे. (Muslim clerics were also outraged by Asaduddin Owaisis statement)
मुस्लिम ओवैसींच्या (Asaduddin Owaisi) वक्तव्यावर खूश नाहीत. ते त्याचे समर्थनही करीत नाहीत, असे लखनऊच्या दारुल उलूम फिरंगी महलीचे प्रवक्ते मौलाना सुफियान निजामी यांनी सांगितले. दोन समाजातील वादाचे रूपांतर मंदिर आणि मशिदीच्या वादात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपला राजकीय अजेंडा बनवून असे वक्तव्य केले जात आहे. मात्र, खेदाची बाब आहे की, जे मुस्लिमांचे नाव घेऊन त्यांना पाठिंबा देण्याचे बोलतात, अशा लोकांनी कधीही मशिदीबाबत काहीही केले नाही, असेही मौलाना सुफियान निजामी म्हणाले.
अशी विधाने केवळ राजकीय विधाने करण्यासाठी आहेत. जेणेकरून दोन समुदायांना समोरासमोर आणून राजकारण करता येईल. अशी विधाने करण्यामागे कोणाचा हात आहे हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे, असेही मौलाना सुफियान निजामी (Muslim cleric) म्हणाले.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ओवैसी हे मुस्लिमांचे भस्मासुर आहेत. भारतातील मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नसताना त्यांच्या स्मारकांचा प्रश्न आला की ओवैसी अस्वस्थ का होतात. ओवैसींनी आज मातृशक्तीचा अपमान केला आहे, असेही मिश्रा म्हणाले.
ओवैसी काय म्हणाले होते?
भारतातील मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही; पण, मुघल सम्राटांच्या पत्नी कोण होत्या ते सांगा, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी गुजरातमधील सुरत येथे सभेला संबोधित करताना उद्ध्वस्त केलेल्या बौद्ध मंदिरांबद्दल भाजप का बोलत नाही, असेही म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.