उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये फूड डिलिव्हरी बॉयवर बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. हा डिलिव्हरी बॉय एका विशिष्ट समाजाचा असल्याने त्याला मारहाण करण्यात आली. लखनऊच्या गोमतीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील विनीत विभागात ही घटना घडली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी या प्रकरणाचा तपास करत एका आरोपीला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि विशिष्ट समाजाविरुद्ध द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.