सकाळ डिजिटल टीम
बिहारमधील मुस्लिमांचे (Muslim) नागरिकत्व काढून घेण्याबाबत भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर बच्चौल यांनी केलेल्या वक्तव्यावरून बिहारमधील राजकारण तापले आहे. बुधवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि उद्योगमंत्री शाहनवाज हुसेन यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान तेजस्वीचा मोठा भाऊ तेज प्रताप यादवही (tej pratap yadav) संतापले आणि भाजप आमदारांशी वाद घालताना दिसले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी राज्य सरकारच्या धोरणांव्यतिरिक्त भाजप-जेडीयू युतीवर बोलण्यास सुरुवात केल्याने गोंधळ झाला. भाजप आमदाराच्या वादग्रस्त विधानाचा मुद्दा उपस्थित करीत त्यांनी शाहनवाज हुसेन यांचा खरपूस समाचार घेतला आणि तुमचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जाईल, असे सांगितले. नंतर उद्योगमंत्री शाहनवाज हुसेन यांनी उत्तर दिले की, भारतातील सरकारला नागरिकत्व देण्याचा अधिकार आहे, तो काढून घेण्याचा नाही.
तेजस्वी यादव (tej pratap yadav) म्हणाले, मुस्लिम बांधवांचे हक्क (Right to vote) हिसकावून घेऊ शकेल इतका कोणात दम नाही. मात्र, धर्मनिरपेक्षतेचा झगडा घालून धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री नुसते बसले आहेत. टाळ्या वाजवत आहेत, याचे आश्चर्य वाटते. शाहनवाज भाई तुमचा मतदानाचा हक्क काढून घेतला जाईल. तुम्हाला मतदान करता येणार नाही. बिहारचे मुख्य सचिव कोण आहेत? मुख्य सचिवांकडून मतदानाचा हक्कही हिसकावून घेतला जाईल.
...यावर कोणतीही चर्चा होऊ नये
कोणत्याही सरकारला नागरिकत्व घेण्याचा अधिकार नाही. सबका साथ सबका विकास, सबका विश्वास या मार्गावर चालणारे आपण आहोत. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्या लोकांनी ही मातृभूमी आहे हे ठरवले ते इथेच राहिले. जेवढा तुमचा देश आहे, तेवढाच सर्वांचा आहे. कोणीही बाहेर काढू शकत नाही. यावर कोणतीही चर्चा होऊ नये, असे तेजस्वीच्या आरोपांना उत्तर देताना शाहनवाज हुसेन म्हणाले.
काय म्हणाले होते?
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी भाजप आमदार हरिभूषण ठाकूर यांनी मुस्लिमांकडून (Muslim) मतदानाचा हक्क (Right to vote) हिसकावून घेण्याची मागणी केली होती. १९४७ मध्ये धर्माच्या नावावर देशाची फाळणी झाली. त्यांना दुसरा देश मिळाला, दुसऱ्या देशात जा. येथे राहत असल्यास त्यांचा मतदानाचा हक्क रद्द करावा, अशी माझी सरकारकडे मागणी आहे. तो दुसऱ्या स्तराचा नागरिक म्हणून भारतात राहू शकतो. नक्की एक अजेंडा आहे, आयएसआयचा एक अजेंडा आहे, इस्लामिक स्टेट तयार करण्याचा अजेंडा आहे. पाकिस्तानकडे बघा, तो मानवतेचा शत्रू आहे, असे ते म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.