मुस्लीम महिला आमदाराची मंदिराला भेट; भाजपनं गंगाजल शिंपडून केलं शुद्धिकरण

महिला दुसऱ्या धर्माची असल्यानं मंदीर भेटीला हिंदू गटानं विरोध केला.
Gangajal
Gangajal
Updated on

लखनऊ : एखाद्या नावडत्या व्यक्तीनं किंवा इतर धर्मियांनी हिंदू मंदिरांना भेट दिल्यानंतर गोमुत्र किंवा गंगाजल शिंपडून त्याचं शुद्धीकरण करण्याच्या अंधश्रद्ध प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली असून एका मुस्लिम महिला आमदाराला या प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे.

या मुस्लीम आमदार महिलेनं हिंदू मंदिराला भेट दिल्यानंतर त्याच्या शुद्धीकरणाचा प्रकार समोर आला आहे. (Muslim women MLA visited the temple BJP leader performed purification by sprinkling Ganga water)

Gangajal
ShivSena MLA Disqualification: आजची सुनावणी संपली! ठाकरेंची कागदपत्रं खोटी असल्याचा जेठमलानींचा दावा; 'ही' दिली कारणं

समाजवादी पार्टीच्या आमदार सायदा खातून यांनी दावा केला आहे की, "शनिवारी मी सिद्धार्थनगर जिल्ह्यातील धोमारियागंज या आपल्या मतदारसंघातील बालवा गावात गेले होते. इथल्या ग्रामस्थांनी संध्याकाळी 'महाचंडी यज्ञा'चं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्यांनी तिथल्या मंदिरालाही भेट दिली. (Marathi Tajya Batmya)

Gangajal
Ban On Pakistani Artistes: "इतक्या कोत्या मनाचं असू नये"; पाकिस्तानी कलाकारांवर बंदीच्या याचिकेवरुन सुप्रीम कोर्टानं फटकारलं!

मंदिरभेटीवरुन वाद

मी मंदिरात जाणार असल्यानं काही लोक विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, तरीही मला मंदिरात जाण्यापासून ग्रामस्थांपैकी कोणीही रोखलं नाही. मी मतदारसंघातील अनेक मंदिरांसाठी काम केलं आहे तसेच या ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. पण तरीही काही लोकांनी वैयक्तिक प्रसिद्धीसाठी विनाकारण माझ्या मंदिर भेटीवरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असंही खातून यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

Gangajal
Pune News : माझ्यामुळेच छगन भुजबळ तुरुंगाबाहेर; ॲड. प्रकाश आंबेडकर

मांसाहारी असल्यानं शुद्धीकरण

पण हिंदू गटानं आरोप केला की, आमदार महिला ही दुसऱ्या धर्माची आहे. त्यामुळं तिच्या भेटीमुळं मंदिराचं पावित्र्य धोक्यात येईल. त्यामुळं माझ्या मंदिर भेटीनंतर या लोकांनी गंगेचं पाणी शिंपडून मंदिराचं शुद्धिकरण करण्याचा प्रयत्न केला. ज्यानं हा प्रकार केला त्या धर्मराज वर्मा नामक व्यक्तीनं म्हटलं की, खातून यांनी आमच्या मंदिराचं पावित्र भंग केलं. त्या मांसाहारी असल्यानं त्यांनी मंदिराला भेट देणं टाळायला हवं होतं. (Latest Marathi News)

Gangajal
Uttarakhand Tunnel Collapse Rescue: ४१ कामगार ३-४ तासांत बोगद्यातून बाहेर पडतील, NDMA सदस्य काय म्हणाले?

शुद्धीकरण करणारा भाजपचा नेता

या घटनेनंतर पोलिसांनी बलवा गावातील सुरक्षेत वाढ केली आहे. पण याप्रकरणी त्यांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. शुद्धीकरणाचं कृत्य करणारा वर्मा हा भाजपचा जुना कार्यकर्ता असल्याचं भाजपच्या जिल्हाध्यक्ष कन्हैय्या पासवान यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.