AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

AIMIM Chief Asaduddin Owaisi: तुम्ही द्वेषाची भिंत का उभी करत आहात? मुस्लिम जास्त मुले जन्माला घालतात अशी भीती तुम्ही का निर्माण करत आहात? असा सवाल हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे.
AIMIM Chief Asaduddin Owaisi
AIMIM Chief Asaduddin OwaisiEsakal
Updated on

नुकत्याच झालेल्या एका सार्वजनिक रॅलीत AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांमधील लोकसंख्या वाढीबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर टीका केली. त्याचबरोबर "मुस्लिम सर्वात जास्त कंडोम वापरतात"असंही त्यांनी म्हटलं आहे.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बोलताना सांगितले की, मुस्लिम सर्वात जास्त कंडोम वापरतात. ओवेसींचे हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर केलं आहे. ओवेसी म्हणाले, नरेंद्र मोदी हिंदूंमध्ये मुस्लिम बहुसंख्य समाज बनतील अशी भीती निर्माण करत आहेत. किती दिवस तुम्ही मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करणार आहात. आमचा धर्म वेगळा आहे, पण आम्ही या देशाचे आहोत.

AIMIM Chief Asaduddin Owaisi
Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले, तुम्ही द्वेषाची भिंत का उभी करत आहात? मुस्लीम जास्त मुले जन्माला घालतात ही भीती तुम्ही का निर्माण करत आहात? मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार मुस्लिमांची लोकसंख्या वाढ कमी झाली आहे. ओवेसी पुढे म्हणाले की, मुस्लीम कंडोमचा सर्वाधिक वापर करतात आणि मला हे सांगायला लाज वाटत नाही.

AIMIM Chief Asaduddin Owaisi
Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

“मुस्लिमांनी जास्त मुले जन्माला घालण्याची भीती तुम्ही का निर्माण करत आहात? मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार, मुस्लिमांमधील लोकसंख्या वाढ आणि प्रजनन दर कमी झाला आहे. मुस्लिम सर्वात जास्त कंडोम वापरतात, आणि मला हे सांगायला लाज वाटत नाही,” असं ओवेसी यांनी एका जाहीर सभेत सांगितले आहे.

ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांच्यावर दलित आणि मुस्लिमांबद्दल वैर निर्माण करण्यासाठी खोटेपणा पसरवल्याचा आरोप केला आहे. “एखाद्या देशाचा पंतप्रधान देशातील 15 टक्के लोकसंख्येला घुसखोर म्हणतो, यापेक्षा लाजिरवाणी दुसरी गोष्ट असू शकत नाही,” असं ओवेसी रॅलीत म्हणाले आहेत.

AIMIM Chief Asaduddin Owaisi
Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

राजस्थानच्या बांसवाडा येथील रॅलीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्ष सत्तेत असल्यास मुस्लिमांना संपत्ती वाटपाला प्राधान्य देईल असा आरोप केल्यानंतर ओवेसी यांनी हे वक्तव्य केले आहे.

राजस्थानच्या बांसवाडा येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले होते, की काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास संपत्तीचे मुस्लिमांमध्ये वाटप करण्याला प्राधान्य देईल, आणि याचा घुसखोरांना फायदा होईल. मोदींच्या या वक्तव्याबाबत ओवैसींनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.