'आयएनएस'च्या अध्यक्षपदी 'मातृभूमी'चे श्रेयांस कुमार, तर सदस्यपदी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची निवड

Indian Newspaper Society : ‘आयएनएस’च्या अध्यक्षपदी एम. व्ही. श्रेयांश कुमार (मातृभूमी) यांची निवड झाली आहे.
Indian Newspaper Society
Indian Newspaper Societyesakal
Updated on
Summary

‘इंडियन न्यूज पेपर सोसायटीची (Indian Newspaper Society) ८५ वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली आणि त्यात २०२४-२५ या वर्षासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली.

नवी दिल्ली : देशातील वृत्तपत्रे, नियतकालिकांच्या प्रकाशकांची सर्वोच्च संस्था असलेल्या इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) अध्यक्षपदी केरळमधील मातृभूमी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. श्रेयांस कुमार यांची निवड झाली आहे. तर ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार (Prataprao Pawar) यांची सदस्यपदी नेमणूक झाली आहे.

इंडियन न्यूज पेपर सोसायटीची (Indian Newspaper Society) ८५ वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली आणि त्यात २०२४-२५ या वर्षासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. यात ‘आयएनएस’च्या अध्यक्षपदी एम. व्ही. श्रेयांश कुमार (मातृभूमी) यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष राकेश शर्मा (आज समाज) यांच्याकडून ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील.

Indian Newspaper Society
Sakal Editorial Article : अग्रलेख - विकृतीला पायबंद

तर ‘डेप्युटी प्रेसिडेंट’पदी ‘सन्मार्ग’चे विवेक गुप्ता यांची आणि व्हाइस प्रेसिडेंट’पदी लोकमतचे करण राजेंद्र दर्डा (लोकमत) यांची निवड झाली आहे. अमर उजालाचे तन्मय माहेश्वरी हे ‘आयएनएस’चे मानद खजिनदार असतील. तसेच मेरी पॉल या सोसायटीच्या सेक्रेटरी जनरल असतील.

Indian Newspaper Society
Sakal Editorial Article : भाष्य - अमेरिकी निर्बंधांचे 'औषध'

सदस्यांची नावे

एस. बालसुब्रह्मण्यम आदित्यन (दैनिक थंथी), गिरीश अग्रवाल (भास्कर), समहित बाल (प्रगतीवादी). समुद्र भट्टाचार्य (हिंदुस्तान टाइम्स).श्रीमान होर्मुसजी एन. कामा (बॉम्बे न्यूज), गौरव चोप्रा (फिल्मी दुनिया), विजयकुमार चोप्रा(पंजाब केसरी), डॉ. विजय जवाहरलाल दर्डा (लोकमत)जगजित सिंग दर्दी (दैनिक चडदीकलां), विवेक गोयंका (द इंडियन एक्स्प्रेस), महेंद्र मोहन गुप्ता (जागरण)प्रदीप गुप्ता (डेटाक्वेस्ट), संजय गुप्ता (दैनिक जागरण,), शैलेश गुप्ता (मिड डे), शिवेंद्र गुप्ता (बिझनेस स्टॅण्डर्ड), योगेश जाधव (पुढारी), श्रीमती सरविंदर कौर (अजित), डॉ. आर. लक्ष्मीपती (दिनमलार), विलास ए मराठे (दैनिक हिंदुस्थान), हर्षा मॅथ्यू (वनिथा), अनंत नाथ (गृहशोभिका, मराठी), पी. व्ही. निधिश (बालभूमी), प्रतापराव पवार (सकाळ माध्यम समूह).

तसेच राहुल राजखेवा (द सेंटिनल), आर.एम. आर. रमेश (दिनकरन), अतिदेब सरकार (द टेलिग्राफ), पार्थ पी. सिन्हा (नवभारत टाइम्स), प्रवीण सोमेश्वर (द हिंदुस्थान टाइम्स), किरण डी. ठाकूर (तरुण भारत, बेळगाव), बिजू वर्गिस (मंगलम प्लस), आय. वेंकट (ईनाडू), कुंदन आर. व्यास (व्यापार - जन्मभूमी), के.एन. तिलक कुमार (डेक्कन हेरॉल्ड आणि प्रजावाणी), रवींद्र कुमार (द स्टेट्समन), किरण बी. वडोदरिया (वेस्टर्न टाइम्स), सोमेश शर्मा (साप्ताहिक राष्ट्रदूत), जयंत मामेन मॅथ्यू (मल्याळम मनोरमा), एल. आदिमूलम (हेल्थ अॅन्ड द अॅन्टीसेप्टिक), मोहित जैन (इकॉनॉमिक टाइम्स), के.आर.पी. रेड्डी (साक्षी), राकेश शर्मा (आज समाज).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.