माझे नाव Kovid आहे पण, मी Virus नाही

माझे नाव Kovid आहे पण, मी Virus नाही
Updated on

बंगळूरू : कल्पना करा की, ३१ वर्षापूर्वी तुमचे नाव कोविड कपूर असे ठेवले आणि कोविड (Covid) व्हायरसच्या महामारीमुळे आता सर्वांना तुमचे नाव विचित्र वाटत असेल तर? बंगळुरूमधील कोविड कपूर (Kovid Kapoor) नावाच्या व्यक्तीची सध्या हीच अवस्था आहे. कॉपी शॉपमध्ये जेव्हा त्याला कोविड असे नाव जोरात घेतले जाते, तेव्हा प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसतो. कोविड कपूरने सध्या जगभरातील वेगळ्या आणि आजच्या काळात अतिशय वाईट नावामुळे खूप त्रास सहन केला आहे. गेल्या दोन वर्षात सहन केलेल्या त्रासाबाबत त्याने Brut मीडियासोबत संवाद साधला.

बंगळुरूमध्ये राहणाऱ्या कोविड कपूरने सांगितले की, ''मी जिथेही जातो तिथे माझे नाव ऐकून लोकांना धक्का बसतो. पण मला असे वाटते की हे नाव इतके वाईट नाही. माझ्या नावामुळे आता कोरोना व्हायरस सोबत मी कायमचा जोडला गेलो आहे. पण माझ्यासाठी महामारीच्या सुरुवातीच्या काळात या सर्वाचा सामना करणे सोपे नव्हते. सुरुवातीला सार्वजनिक जागी माझ्या नावावरून मस्करी करत असल्यामुळे मलाच धक्का बसला होता.''(My name is Kovid Kapoor but I'm not Virus)

माझे नाव Kovid आहे पण, मी Virus नाही
Hug Day : गळाभेट द्या, मालामाल व्हा!

ट्रॅव्हल एजन्सी चालवितो कोविड

एक ट्रॅव्हल एजन्सीचे मालक ३१ वर्षीय कपूरने सांगितले की, '' गेले २ वर्षामध्ये खूप वैताग आणणारे होते. जेव्हा डब्ल्यूएचओ (WHO) कोरोना महामारीचे अधिकृत नाव घोषित केले तेव्हा मला जाणवले, माझे नाव आणि या आजाराचे नाव जवळपास सारखेच आहे. पण त्यासाठी मी काही करू देखील शकत नव्हतो. पण हा रंजक योगायोग होता.''

कोविडने सांगितले की, ''जेव्हा २०१९च्या शेवटी सर्वात पहिल्यांदा कोरोवा व्हायरस जगासमोर आला होता, तेव्हापासून त्याचे मित्र, कुटंबियांमध्ये माझ्या नावावरून कधीही न संपणाऱ्या विनोदाची आणि मीम्सची सुरूवात झाली. मला याची आजिबात कल्पना नव्हती की, ही मस्करी माझ्या मित्र-परिवाराच्या बाहेर, सार्वजनिक ठिकाणी देखील सुरू होईल. काही काळातच मला समजले कीस जेव्हा कोणत्या रेस्टॉरंटमध्ये माझे नाम मोठ्याने उच्चारले जात होते,तेव्हा इतर ग्राहक माझ्याकडे रोखून पाहत असे. कधी कधी माझे मित्र सार्वजनिक ठिकाणी देखील माझ्या नावाची मस्करी उडवित असत, त्यामुळे इतर लोकही माझ्याकडे मी विदुषक असल्यासारखे पाहत असे, जे नेहमीच एक रंजनात्मक गोष्ट होती.''

माझे नाव Kovid आहे पण, मी Virus नाही
Promise Day का साजरा करतात? पार्टनरला द्या 'हे' ५ वचन नातं होईल सुंदर

कोविड कपूरने सांगितले की, बहूतेक लोकांना वाटत होते की, मी माझ्या नावाबाबत खोटे बोलत होते किंवा मस्करी म्हणून बदलले आहे, असे वाटत असे. गेल्या वर्षी ३० व्या वाढदिवशी जेव्हा मित्रांनी माझ्यासाठी केक मागविला पण, बेकरी मालकाला वाटले की, नावामध्ये काहीतरी चूक आहे त्यामुळे त्याने Kovid ऐवजी Covid असे नाव लिहले. माझ्याकडे अशा मज्जेदार घटनांची मोठी यादी आहे.

मला एअरपोर्ट, हॉटेलमध्ये सतत माझ्या नावावरून मस्करीचा सामना करावा लागला. एअरपोर्टवर सिक्युरिटी आणि इमिग्रेशन (security and immigration) अधिकारी हसत म्हणत असे, की, ''अच्छा, आता कोविड श्रीलंकेला जात आहे.'' जेव्हा मी हॉटेलमध्ये जात असेल तेव्हा तिथेल स्टाफ देखील माझी मस्करी करत असे की, आम्हाला तुमची रूम क्वारंटीनमध्ये नाही ठेवावी लागणार अशी आम्ही आशा करतो''

एका ट्रॅव्हल कंपनीचा मालक कोविड कपूर सोशल मिडियावर व्हायरल झाला ते एका सोशल मिडिया पोस्टमुळे. स्वत:च्या नावाची मस्करी उडवित त्याने सोशल मिडियावर पोस्ट केले की, ''माझे नाव कोविड आहे आणि मी व्हायरस नाही. हे विनोद आयुष्यभर ऐकावे लागणार याची जाणीव कोविड कपूरला आहे. तो म्हणाला की,'' यासाठी मी आता चिंता करत नाही. लोकांवर न चिडता, स्वत:वर थोड हसून मी सक्षम व्हायला पाहिजे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.